TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
नरदेहामध्यें येऊन गड्या...

रामजोशी - नरदेहामध्यें येऊन गड्या...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


रामजोशी

नरदेहामध्यें येऊन गड्या त्त्वां हित केलें नाहीं ।

दारधनाचा लोभ सोडशी तर साधल तुज कांहीं ॥ध्रु०॥

हरिची माया अगाध जेथें ब्रह्मादिक फ़सले ।

तूं तर मानव तनूचें पामर त्यांतहि कामादिक वसले ।

नाना प्रकारचे विषय मनामधें येऊनियां घुसले ।

काय तुझा तरी पाड गाधिज पाराशरादिक तळीं बसले ।

या मदनावरी शुकासारखे विरळे कुणि रुसले ।

बाकी नर या भवाब्धिमध्यें लोळती किती थकले ।

यासाठी बा तुला सांगतो सावध मनीं राही ।

रात्रंदिवस उदकाहुनि चंचळ आयु जात पाही ।

नरदेहामधें येऊन गड्यां त्त्वां हित केले नाहीं ॥१॥

तूं म्हणसी या संसारामध्ये सुख पाहिन मोठें ।

परंतु जितके पाहसिल तितके दृश्य सर्व खोटें ।

अंतिं यमाच्या हातांत गेल्यावरी तूं कुणीकडे तनु कोठें ? ।

तूं म्हणशी मी चिरायु परि तो काळ मोजी बोटें ।

ना आइकलें तरी जगतीतळिं या विषमविषाची खिर घोटे ।

विषयवासना धरशील परि हे नागवितील साही ।

तुझी इंद्रियें तुला बाधक होतील परिणामी दाही ॥२॥

बाळपणामधिं तनु घालविली खेळुनिया सारी ।

तरुणपणामध्यें बहार माजला रांड झाली प्यारी ।

ते तर जातिल निघून उद्यां गड्या दिवस पहा चारी ।

मग घालविसी बाहेर पैसा घरची झाली म्हातारी ।

तेही गेले मग कोण पुसतो घरांत दमडी ना ज्वारी ।

रांड बिघडली फ़जिती झाली देणेकरि द्वारीं ।

अशा संकटीं कोण सोडविल तुझ्या मनाला ग्वाही ॥३॥

वृध्दपणामधि पुत्रादिक तुज म्हणतिल कीं निबरा ।

आणिकही वाचशिल कुठवर करुन जनाच्या किती कबरा ।

तुझ्या सुना तुज म्हणती मेला म्हातारा हा बहु लुबरा ।

उगाच पडे खाटेवर तुजला कशास व्हाव्या घरखबरा ।

शक्तिरहित तूं रांड घरांतुनि गळा करुनी जबरा ।

दरडाविल मग सोसून पडसील त्यांचा सांभाळूनि उंबरा ।

जें झालें तें बरेंच झालें अजुनि तूं सावध होई ।

करुनिया मन सुमन शीघ्र कविराया पदीं वाही ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-02-20T04:28:48.5500000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

allowed energy zones

  • अनुमत ऊर्जा कटिबंध 
RANDOM WORD

Did you know?

श्रीयंत्रातील चक्र आणि त्रिकोण कशाचे प्रतिक आहेत?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site