TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
यंदा घरधन्याने धंदा के...

रामजोशी - यंदा घरधन्याने धंदा के...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


यंदा घरधन्याने धंदा केला

यंदा घरधन्याने धंदा केला, कटकाला गेला ॥ध्रु०॥

शिंदे होळकर आले कळवंडी, मरणाची हुंडी ।

घिरष्ठी त्या रणांत जगली मुंडी, हुंडीवर हुंडी ।

फ़ुटली भलत्यासीच भलता दंडी, पैक्याला धुंडी ।

शिरति किति पठाण यांच्या झुंडी, देऊन तरमुंडी ।

झाले सबळांचे शिपाई लंडी, तृण धरिती तुंडी ।

धरिती ब्राह्मणादिकांची शेंडी, गवसल्या न संडी ।

घेती मोहोरांनी भरली गुंडी, जडिताची करंडी ।

हंडे मग पळी पितळी कासंडी, कोण पुसतो गिंडी ।

कैची तागडी कशाची दांडी ॥ +++ लोळति+जिन्नस लोखंडी ।

अशि दुनिया लुंडी ॥ केली भंगिल्या शिवाच्या पिंडी ।

किति गणपती चंडी ॥ कैच्या मग तेथे धड उतरंडी ।

कण नाहीं वरवंडी ॥ गर्दी गुरु कोण कुणाचा चेला ।

कटकाला० ॥१॥

झाली भूतळांत अंदाधुंदी, मग उठले फ़ंदी ।

नानापरि बंडे गैर संदी, घातुक मुत फ़ंदी ।

त्यागी गंगा तट लांबी । रुंदी, आसमुद्रकुंदी ।

केली धरुन चोळी चिंदी, द्विज घालुनी बंदी ।

भोवतालीं सिबंदी, सारी मग त्याचिच नाके बंदी, जावया संदी ।

म्हणतो" बेदर, लाव, सुना, बिंदी, कुच नगदा चंदी ।

लौले कुच खिलाव दळिया बुंदी । क्यौ इतनी रिंदीं" ।

नाहीं म्हणता मग मार बिलंदी । या खटल्या संबंधी ।

देती वाचला न कोणी तिंदी । प्राणाची मंदी ।

पायी यवनाच्या ब्राह्मण वंदी । नच सोडति दंदी ।

सांगू किति दुनियेवर बेबंदी । ही मसलत खंदी ।

ऐसा भूलोक यमानें केला ।

कटकाला० ॥२॥

वाटे बा प्रलयच श्रीरंगा । आजच्या प्रसंगा ।

अटकेपासुनि घराही गंगा । यवनाच्या चुंगा ।

हिंदु लागलेच त्या अनुषंगा । हतीं नग्न फ़िरंगा ।

भाले तिरकमटे बरच्या सांगा, उडविता तुरंगा ।

कांहीं कर्नाटक, देश तेलंगा, जगला परि बिंगा ।

केला त्या फ़िरंग्यांनीं मुंगा, घेउनिया नंगा ।

कोठें राहिला न पाला लुंगा । वाळला गळंगा ।

आधी जन भ्याले काळभुजंगा, त्यावर हा धिंगा ।

मांस मद्याच्या भरल्या तुंगा, त्या द्विजोत्तमांगा ।

वर त्याही बिगार केवढा दंगा, क्षिती नेली भंगा ।

याणें जगडणियां आणिला शिंगा, कुतराही कुलंगा ।

यावें बाई झड्करी मत्संगा पाहुनी प्रसंगा ।

माझा कविराय फ़ुलांचा झेला । कटकाला गेला ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-02-20T04:58:54.3470000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

post zone

  • पश्चभाग 
RANDOM WORD

Did you know?

जेवण उष्टे सोडून अन्नाचा अपमान करणार्याला विविध शास्त्र, पुराणात काय शिक्षासांगितली आहे कृपाया संदर्भासह स्पष्ट करणे .
Category : Vedic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.