TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
कुंदरदन तनु शाम सुलोचन...

रामजोशी - कुंदरदन तनु शाम सुलोचन...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


रामजोशी

कुंदरदन तनु शाम सुलोचन कोण ताई मज हा नित्य हाटकी ॥ध्रु०॥

मोर मुगुट शिरि करी धरी वेणु । पीत वसन वनीं चारित धेनु ।

कोण कोठिल गाई मी तर नेणू । धीट खुणाउनि वाजवी चुटकी ।

कुंदरदन तनु शाम सुलोचन ॥१॥

काल मला चुचकारुन ओढी । ठावि नसे मजही कांहीं गोडी ।

आरडतां कुच रगडून सोडी । आण तुझी बाई मी नव्हे लटकी ।

कुंदरदन तनु शाम सुलोचन कोण बाई ॥२॥

याची माझी कधिं ओळख नव्हती । काय पिडा ही मज भोंवता ।

हा परवर आग लागो माझी नवती । काय तर्‍हा कविराय उध्दवली ।

कुंदरदन तनु शाम सुलोचना कोण बाई ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-02-16T21:47:12.6170000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

बोहिरी

  • स्त्री. 
  • देशाबाहेर घालविणें ; देशवटा ; हद्दपारी . जाली तापासी बोहरी । ते परिएसा पां । - ऋ १२ . 
  • नाश ; चुराडा नाचून केली बोहरी । त्या सर्पाचिया दर्पाची । - रास ३ . २१६ . 
  • वणवा ; अग्नि . नाना वनामाजी बोहरी । कड सणी जेवीं न करी । - ज्ञा १८ . ५५५ . [ ? ] बोहरा , बोहारा - वि . ( व . ना . ) अभद्र ; कपाळकरंटा ; सत्यनाश करणारा ; त्रासदायक व अप्रिय व्यक्ति . 
RANDOM WORD

Did you know?

दत्तकपुत्र घेण्याविषयी कांही धर्मशास्त्रीय निर्णय आहेत काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.