मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
कोण्याग सुभगाची मदनमंजर...

रामजोशी - कोण्याग सुभगाची मदनमंजर...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


कोण्याग सुभगाची मदनमंजरी ।

सांग सखे सुंदरी ॥ध्रु०॥

इच्या सौंदर्याची सीमा । झाली गडे रतिहुनि अति उत्तमा ।

पाहुनिया मुखचंद्रमा । सखे गडे अमा गमति पौर्णिमा ।

काय अधराची रक्तिमा । लाजवी नव कुंकुम विद्रुमा ।

अंगिं वसन जिच्या भर्जरी । कोण्याग सुभगाची ॥१॥

मज वाटली विद्युन्नटी । भलिग रुपाची उतरली भटी ।

उरिं कंचुकि घट तटतटी । टिळक लल्लाटी सुधारस घटी ।

पाहुनी कृशा तव कटी । हरीचा कृश कटिमद लटपटी ।

अशि - अनंत गुणगुर्जरी । कोण्याग सुभगाची ॥२॥

शिरी सुंदर नव मल्लिका । झटति वर मधुकर रस कौतुका ।

नयनाननखंजन रंजिका । मधुकर कंठात लाजवी पिका ।

अशि वर्णिल कोण सदलिका । इतर कवि कविरायाहुनि फ़िका ।

मज वाटतसे निर्जरी । कोण्याग सुभागाची मदनमंजरी ।

सांग सखे सुंदरी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 17, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP