मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
कांताला एकांतीं कधिं प...

रामजोशी - कांताला एकांतीं कधिं प...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


कांताला एकांतीं कधिं पाहु गे सखये ।

वाटते असें पुढें जाउनि उभी राहु गे सखये ॥ध्रु०॥

मी तर सासुरवासी म्यां कोणावर रुसावें ।

सासर्‍या गांवीं हे कांहीं तरी असावें ।

नणंदा सासु जाऊ यांणी कांहीं मज पुसावें ।

ती कांहींच नाही, हां हु किति सांहू ।

कांताला एकांतीं० ॥१॥

मजहुनि पति भिडस्त युक्ति कैसी गे करावी ।

कुठवरि तरि मर्यादा वडिलांची याणी धरावी ।

मी अर्धांगी घरची काय आहे कोणी परावी ।

काय त्यास खुणाउनि बाहूं सुख लाहूंगे सखये ।

कांताला एकांतीं० ॥२॥

मी द्वादशवर्षाची वय न लगे बाई कलिला ।

हें तर आठवे वर्षी कळूं येते बाई मुलिला ।

रतिपतीचें भय नाहीं असे कोणातरि मुलिला ।

कविराय मति लाऊं मन बाहूं गे सखये ।

कांताला एकांती० ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 17, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP