मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
बाई नको जाऊं यमुनातीरी...

रामजोशी - बाई नको जाऊं यमुनातीरी...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


बाई नको जाऊं यमुनातीरी

नंदाचा नंदन हरि करितो बळजोरी, धरिल गे पदरीं ।

तूं नाजुक रुपसुंदरी सुभग मंदिरीं तुझें अंतरी कळेना परी ॥ध्रु०॥

या वनांत चारित धेनु वाजवी वेणू मलागे भुल पडली ।

हाकमाचा मुल म्हण हाटा करील पानघटा धरीच मनगटा

तो आहे नकली ।

कोणाचा धाक नाही जरा ।

मायबाप धरा म्हणती मुल हरामि याची बुध कळली ।

काल गवळ्याची एक नवी मूल या गांवी दुपार धरली ।

बाई उरांत करी धडधडा मारितो चिमखडा होईल भडभडा

मात हे उठली ।

तूं आधींच रुपराजसा, म्हणे बहुदिसा मला सांपडली ।

गवळणीवर त्याचा सिका तयाच्या हाका वदे त्या फ़ुका कोण

जाऊं सकळी ।

॥चाल॥

त्या वनांत जासिल कशी कांहीं नित नाहीं ।

हाकमापाशीं तूं तरुणी सासुरवासी ।

त्याला पाहुनि बावरी होशी तो कपटी कुंजनवासी ।

तो बोलुनि गोड हळुच वदनीं घर घेऊं पाहे कंसारी ।

पोरें मिळउनि करि हा तमाम जाहली सिमा भुलवली

गोकुळनगरी ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : February 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP