मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
धांव गणपते सदनी या क्...

रामजोशी - धांव गणपते सदनी या क्...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


धांव गणपते सदनी या क्षणा ये त्वरा करोनी ॥ध्रु०॥

धांव पाव, हावभाव दाव घाव दाव राव हा नको ।

उंदिरा बसुनिया सुंदरा त्रिभुवना विद्यामंदिरा ।

भरवुनी जा रंगी इंदिरा गणविरा ।

विघ्नराज देवा बापा हरिशिल सर्व त्रिविध तापा ।

तार तार, भार वार कारभार फ़ार वार बार पार करी ॥१॥

पंडिता अंकुश परशुनें मंडिता ।

नाहीं त्वन्निभ रे धुंडिता ।

पदनतविघ्नखंडिता । वरदेशा ।

देवा कुंदमंद हासा । त्रिभुवन मंगलाधिवासा ।

थाटमाट हाटकादि ताट पाट घाट दाट भाट वाट पाहे ॥२॥

वंदन करितो गिरिजानंदना ।

झडकरी टाकून ये स्यंदना ।

करिशिल सदरिच्या कंदना ।

भालचंद्रा सर्वलोकताता । देवा तू तर नाट्यगीता ।

कविराज राजकाज साज गाज वाज वाज माज बांध ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 16, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP