मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
नऊ दिवस नवरात्र गृही प्रा...

लावणी - नऊ दिवस नवरात्र गृही प्रा...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


नऊ दिवस नवरात्र गृही प्राणसखा नाही ।

घटी ग बसली अंबाबाई ॥धृ०॥

दिव्य चितारुन भिंती सखे सरंजाम करती ।

लाउन जाळ्या मखरे भरती ॥

चंद्रजोतिच्यापरी दिवे झळकतात वरती ।

किती ग पुतळ्या गरगर फिरती ॥

पडदे चिकाचे सभोवती मधि मांडुन मुरती ।

सदा होई गजराची आरती ॥चाल॥

असा दिवस टावून दुरी गेले आपुल्या पाई ।

कधि ग ते येतिल लवलाही ॥१॥

नाच कथा बैठका गुणी राग बसुन छडती ।

गति ग पखवाजावर झडती ॥

रंगित पिपांमधि सरुकारंजी उडती ।

सुरस स्वर साळुंख्या पढती ॥

कालू कर्णे वाजती पुढे भाग्याची चढती ।

पाहुन जिव माझे तडफडती ॥चाल॥

धीर न धरवे घडीत होते शरिराची लाही ।

जाउ ग धुंडित कोण्या ठाई ॥२॥

स्वारि सख्याची येइल कधी मिरवत डौलात ।

बसुनिया चौरंग डोलात ॥

घेतिल मुजरे मिजाजिने अमीरतोलात ।

चालतिल कुंजर झोलात ॥

सुदिन दिवस तो होईल मला बहार अमलात ।

विसावा भोगिन महालात ॥चाल॥

हार गजरे गुंफुन हाती करीन चतुराई ।

परोपरी मन रिझविन पाई ॥३॥

पतिविण माझे लाड सख कोण करील दुसरा ।

मला ग नाही कोणाचा आसरा ॥

गंगु हैबती म्हणे अता गोड करा दसरा ।

उभयता दुःख सारे विसरा ॥

महादेवाला लवुन तुम्ही जारे पदर पसरा ।

कठीण जाचिल त्याचा घसरा ॥चाल॥

छंद करुन कटिबंध शिरा गुणिराज गाई ।

प्रभाकर गुणी गुणग्राही ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP