मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
सण शिमग्याचा आला । उठा आ...

लावणी - सण शिमग्याचा आला । उठा आ...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


सण शिमग्याचा आला ।

उठा आनंदामधे रंग खेळू चला ॥धृ०॥

सफेत शेला चंदेरिचा पांघरा ॥

सजुन बसा प्रियकरा ।

समोर राहुन उभी मी चमकेन जरा ॥

कुच कवटाळुन धरा ।

धन्य पुण्यामधी आपुण राज अंबिरा ॥

जोडा सजला शिरा ॥चा०॥

सख्या तुझ्यारे संगतिने ॥

सुखाचा रंग खेळेन प्रीतिने ॥

घडोघडा रूप पाहिन भक्तिने ॥

मुखामधी विडी घालिन शांतिने ॥चा०॥

हौस पुरवा पदर पसरिते तुला ॥१॥

गुलाल गोटे हाति घ्या राजेश्वरी ॥

फेका छातीवरी । ठुमकत येऊन बसेन मांडीवरी ॥

चला राजमंदरी । उशीर करु नये आता उठा झडकरी ॥

मी तुमची सुंदरी ॥चा०॥

वर्षाचा हा सण ॥ करावा गोड सख्या आपण ॥

मरेतो मज राहील आठवण ॥

तुम्हाला माझे गळ्याची आण ॥चा०॥

हसून बोला जाई जुईच्या फुला ॥२॥

बसा झुल्यावर झोपाळा हलविते ॥

रंग पुढे ठेविते । आरसे भवते चौगर्दा लाविते ॥

पिचकार्‍या आणविते ।

रंग केशरी तुम्हावरी उडविते ॥

तुरा शिरी खोविते ॥चा०॥

गुलाबदाण्या भरून ॥ सख्या तुम्ही खेळा प्रीतिकरून ॥

करे कवटाळुन मजला धरून ॥ गळी मी मिठि मारिन फिरफिरून ॥चा०॥

हर्ष काळजापसून माइना मला ॥३॥

जिकडे तिकडे गुलालगदी उठ ॥

मुख झाका बळकट ।

घ्या शेल्याचा वरून लपेटा घट ॥

पतंगी रंग चोखट ।

कोमळहस्ते तुज ऐसा पोपट ।

भिजउन या चांगट ॥चा०॥

हेत आपला पुरविला ॥

बिछोना मउ माशुक करविला ॥

कृष्ण जणु राधेने मोहिला ॥

असा मी प्रियकर वर निजविला ॥चा०॥

तसा पतीने दिस दृष्टी दाविला ॥४॥

काय जन्मांतरी पुण्य आचरले आधी ।

लय लाउन शिवपदी ।

चित्ताजोगा पती रंगमहालामधी ।

पुत्र देउल हरी कधी ।

शब्द न मोडी प्राणसखा गुणनिधी ॥

खडिसाखर जणु दुधी ॥चा०॥

गंगु हैबती म्हणे ॥ तुला नाही देवकृपेने उणे ।

महादेव कविची वस्ती पुणे ।

छंद करी गुणिराज रसपणे ॥

प्रभाकराने बूट प्रियकर गाइला ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP