मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
पहा चरणी लागते । नको येऊ...

लावणी - पहा चरणी लागते । नको येऊ...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


पहा चरणी लागते ।

नको येऊ घरी माझ्या ही भिक्षा मागते ॥ध्रु०॥

जनी डंका वाजला ।

पहिले ते दिस गेले कलि आता माजला ॥

ईश्वर म्या पूजिला ।

चालविला स्नेह अंगे शर्थिने मागला ॥

नित पलंगी नीजला ।

घडोघडी ते आठवुनिया देहे झुरणि लागला ॥चाल॥

दिड मजली खणी शालू तुम्ही मजला घेतले ॥

हौसी पलंगाला खुर रंगित घातले ॥

चौंगर्दा किनखाबी जरि पडदे बेतले ॥चाल॥

कर जोडुन सांगते ॥१॥

उभे वैरी उशाला ।

रात्रिंचा महाल पहाती लाउनया मशाला ॥

नये मृत्यू अशाला ।

अवघ्यांनी पाठ पुरवुन आणिले ह्या दशेला ॥

हवी तरी मी कशाला ।

अबरूला हानी होता राहतिल शालदुशाला ॥चाल॥

आपल्या तुम्ही घरचे नवलाखे मिजाजी ॥

उणा शब्द कानी पडता होइल इतराजी ॥

बाजारी दिसा विकले तरी सख्या मी राजी ॥चाल॥

हाल केवढे भोगते ॥२॥

अवकाश करुनी ।

दिवसातुन एक वेळा येइन मी चोरुनी ॥

रस्त्यात दुरुनी ।

अवचित गाठ पडल्या बोअत जा ठरुनी ॥

बनल्यास फिरुन ।

सापडल्या बसा पलंगी कुच माझे धरुनी ॥चाल॥

विषयांची लालची हो पहिल्यापुन भुकेली ॥

स्नेह घडल्यापसुन माझी कधि सांड न केली ॥

लाखाची उभयता एक एक रात्रा गेली ॥चाल॥

दीप लाउन जगते ॥३॥

प्रीत जैसी लावली ।

सौख्याची आनंदात नाही गंगा वाव्हली ॥

मन तुझिया पावली ।

सय होते जेवताना दिसे ताटी बाव्हली ॥

पुरे तुमची सावली ।

मोटे मित्याने साक्ष देई ईश्वरमावली ॥चाल॥

दिस शाळू निघुन जातो बाई रात्रा तेहतीसी ॥

जाताना जात नाही आग लागो नवतिशी ॥

कोणाची दृष्ट जहाली उभयांचे संगतिशी ॥चाल॥

कंठेल तो कंठिते ।

गुणी महादेव प्रभाकर हे नित कानी ऐकते ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP