मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
प्रियवंता माझा प्रतिपाळ र...

लावणी - प्रियवंता माझा प्रतिपाळ र...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


प्रियवंता माझा प्रतिपाळ रे ॥ध्रु०॥

नको मला अंतर देऊ छेल छबेल्या रे ॥

विनविते म्हणवुन तुजला स्वरुपसजेल्या रे ॥

सुवासिक शेवंतिच्या प्रफुल्लित झेल्या रे ॥

घेतली अक्षई जपमाळ रे ॥१॥

नाही तुझ्या श्रीमंतीला भाळले राया रे ॥

घडोघडी धावत येते प्रीत कराया रे व

परोपरी पहाते पलंगी एकांती वराया रे ॥

ठेविते चरणी आता भाळ रे ॥२॥

फिरे जरी वरती सख्या घार उपाशी रे ॥

तरी तिचे लक्ष सारे लेकरांपाशी रे ॥

तसा घरी देह मन येथे जडले तूंपाशी रे ॥

परकीचा खोटा आला आळ रे ॥३॥

म्हणे गंगु हैबती उभयता जिवाला रे ॥

ऐकुन हर्ष झाला महादेवाला रे ॥

प्रभाकर कवनी रिझवी आपुल्या जिवाला रे ॥

संगीन ज्याचा सूर ताल रे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP