मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
सखा मशी टाकून गेला ऋतू दि...

लावणी - सखा मशी टाकून गेला ऋतू दि...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


सखा मशी टाकून गेला ऋतू दिवसात ॥धृ०॥

नवतीचा पूर बाई आंगी दाटला गे ।

आज उद्या भेटेल म्हणुनी दम धरिला गे ॥

कोण्या सवतिच्या गृही अनुसरला गे ॥चाल॥

दचकुन उठते पलंगी मदन रसात गे ।

सखा मशी० ॥१॥

ढगावरी ढग येती मेघ निघाले ।

पराव्या परदेशी पती चालले ॥

पडनात मजवरी चहुकुनी घाले ॥चाल॥

पती माझे गेले परमुलखात गे ।

सखा मशी०॥२॥

आडव्या उभ्या लाविते पुष्पांच्या झालरि ।

बक्षीस देइन तुम्हा अहो दोशालरी ॥

पिवळा पितांबर देते करावा अगोदरी ॥चाल॥

आता कोण जाइल तरी पडत्या पावसात गे ।

सखा मशी० ॥३॥

दिस जातो इकडेतिकडे रात्र सरेना ।

पतीविलासाच्या गोष्टी कधीही सरेना ॥

येउन हंस मोती चारा चरेना ॥चाल॥

महादेव प्रभाकर गाई सिरताज गे ॥

सखा मशी० ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP