मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
शुक स्वामी सारिखे जितेंद्...

लावणी - शुक स्वामी सारिखे जितेंद्...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


शुक स्वामी सारिखे जितेंद्रिय पूर्णपणे भासता ।

असे हो का ह्रदयांतरी त्रासता ॥धृ०॥

क्रीडा करुनी हास्य विनोदे पलंगावर लोळते ।

विषयकहालिने अति पोळते ॥

जेव्हा लहर मनी येते तेव्हा करी कुच अपुले चोळते ।

अधिरपणे गवाक्ष मग हेळते ॥

पाहुन मनाचा खंबीर दुःखे पहा काढी कोळते ।

तुम्हाला मीच उलती घोळते ॥

संसाराचे सौख्यसार जे तेच बळे नासता ॥१॥

बळजोरीने धरुन खवाटे बळकट कवटाळिते ।

परोपरी मर्जी मी संभाळिते ॥

कमर सैल सोडून प्रीतीने करी मुख कुरवाळीते ।

तिडिक सोसून हुकुम पाळीते ॥ चाहिल तो नित पदार्थ पुरवुन तूसाठी जिव जाळीते ।

सजले स्वरुप निजुन न्यहाळीते ॥

क्षेत्र हाताळुन ऐन रसाचे समयी स्वस्थ बैसता ॥२॥

वर वर करुनी कल्हई अशाने संतत वाढेल कशी ।

करा तरी मनी सगळी चौकशी ।

मनापासुन खुब कसून लावा बळाने तिर तरकशी ।

नका करून बिगार अशी वरकशी ॥

पातळ नितळ शरीर केवळ सुवर्ण बावनकशी ।

बरी आज लाविलीत बरकशी ॥

रसिकरसील्या योग्य रुपाने घरी पद्मिण आसता ॥३॥

मदनपुराने उरी कंचुकी धुर कापुरी दाविली ।

पहा दोहो दंडावर फाटली ॥

बहुत आवरिता कुच नावरिता गाठ निसुर सूटली ।

अजुन नाही भ्रांत कशी फीटली ॥

समाधान मन करुन उठा ही गोड घडी पावली ।

काय सुख सांगू अगन पेटली ॥

महादु प्रभाकर म्हणे उभयता चतुर सुगर दीसता ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP