मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
उतरुन गंगा येउ कशी विटाळश...

लावणी - उतरुन गंगा येउ कशी विटाळश...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


उतरुन गंगा येउ कशी विटाळशी जाहले ।

म्हणुन दूर पंचवटित राहिले ॥ध्रु०॥

पदरी पडल्यापासुन दिली सर्वस्वाची हमी ।

अता का उगिच करता श्रमी ॥

बहुत मंडळी भवती होती त्या कश्यपसंगमी ।

न चाले उपाय पडले कमी ॥

अनकुळ जहाला विटाळ रे म्हणुन त्यजुन ती भुमी ।

परस्पर निघून आले काल मी ॥चाल॥

नाहि भेट तुझी अरे तेव्हापसुन जिवलगा ।

कर्मिले कुठे तरी सांग एकांती ठगा ॥

अतिप्रीत लाउन द्यावयास शिकला दगा ॥चाल॥

हाच राग मज आला सख्या घर्मै करून नाहले ॥१॥

बरे हो तुम्हाला आता तरि यावयास फावले ।

कोणते पुण्य पुढे धावले ॥

दोहो दिवसांमधी येउनमला आज वदन दावले ।

परेसे कसे कारण लावले ॥

पुढिल पुसणे मी अगोदर ते हळुच समजावले ।

पुरे पुरे सर्व भरुन पावले ॥चाल॥

मारु द्या मिठी गळी, शिउन बसा अलिकडे ।

एकांती चला जाऊ, क्षणभर कुणीकडे ॥

मग स्नान करा का दुर पळता पलिकडे ॥चाल॥

कुच करुन उघडे उभी असुन कशी साहले ॥२॥

काल सकाळपासुन मला दिवस मास वाटला ।

जिवावर वेळ क्रमुन लोटला ॥

तरुणदशेचा बहर अंगी उर माझा दाटला ।

किती हो पहा पहा तरि जिव आटला ॥

मदनधनंजय न शिवनसा शरिरांतरि पेटला ।

न धरवे धीर सधिर सूटला ॥चाल॥

घरी पलंग बिछोने पसरुन वर झाडिले ।

किती गुप्तरुपे शहरात वकिल धाडिले ॥

लागे ना कुठे काही शोध स्वता पाडिले ॥चाल॥

लपंडाव मांडिले मी हो अलोभ जळि वाहले ॥३॥

आपण भिउन वागता कसे दैव असे कोपले ।

रसाचे मद भाषण लोपले ॥

सदन संपतीसहीत सख्या सकळ तुला ओपले ।

सगुण गुण पाहून मुळिच सोपले ॥

उगिच नका देऊ मजवरते अंदेशाचे टोपले ॥

शरिर ह्या अकाळजिने चोपले ॥चाल॥

पसरुन पदर निष्कपटपणे सांगते ।

गळी पडुन स्नेहाचे सुख समजुन मागते ॥

लय लावुन पदांबुजी नित मर्जित वागते ॥चाल॥

स्मरण करित जागते सदा मोहो गोडित मोहले ॥४॥

घर परक्याचे अडचणिचे भीड अगदिच सोडून ।

बोलता नये मर्जि मोडून ॥

त्यात चांगली जरी असते, तरि आणते ओढून ।

वृथा काय जिव आपला तोडून ॥

गाठ पडेल पाचव्या दिशी, तेव्हा खोलित कोंडून ।

विनंती करिन कर जोडून ॥चाल॥

जा रामगयेवर त्वरे वस्त्रांतर करा ।

काही धर्म घडावा प्रौढ द्विजा लेकरा ॥

करी कवन गंगु हैबती सुरस प्रियकरा ॥चाल॥

महादेवाची जडण शिरा गुणि माणिक पहाले ॥

प्रभाकर म्हणे नवल वर्तले ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP