मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
एक वेळ भोगुनी फिरुनी काय ...

लावणी - एक वेळ भोगुनी फिरुनी काय ...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


एक वेळ भोगुनी फिरुनी काय मजा ती संगाची ॥

पदर तरी घेउद्या नका करू घडी सर्वांगाची ॥धृ०॥

जसा फुलांचा गेंद तशी भरज्वानी लव थवती ॥

दूरच असा राजसा नव्हे मी गल्लितील गवती ॥

न्हाण अल्यापुन म्या अवज्ञा कधि केली नव्हती ॥

जिवट पाहून आसने स्त्रियेला भ्रतार दाखवती ॥

मार्ग जया पाहिला आधिच कंबर बारिक लवती ॥

संग करुन एकदा फिरतसा नित भवते भवती ॥चा०॥

षोडश वर्षै मुळी वयाला भरून ॥

षण्मास लोटले नसतिल ऐका स्थिरुन ॥

एव्हढ्यात उरासी निजता बळकट धरून ॥चा०॥

तुम्हास भासे फिरुन रात्र नये कदापी रंगाची ॥१॥

न्हाण आले शोभना अंगाचा बांधा लेकुरका ॥

दृष्ट होइल मजप्रती घवघवीत रंग गोरा भुरका ।

सैल सोडिते देह पलंगी नाही मारित मुरका ॥

जिवाकडे पहा जरी विनंती हीच माझी तरका ॥

एक वेळ तेच दहा वेळ नित शंभरदा उरका ॥

सांड जहाली जर जिरा जेव्हा हवा तेव्हा मारा झरका ॥चा०॥

मघापुन विनविते कुणाला तरी ॥

हा स्वार्थ किंवा परमार्थ विचारा तरी ॥

दाटली दिव्याची गरमी सदनांतरी ॥चा०॥

उठुन बसवा करी पहा झाली झोळी पलंगाची ॥२॥

जीव तेथुन सारखा सख्या समजा अंतःकरणी ॥

गेंद फुले सांखळ्या तोरड्या जड झाल्या चरणी ॥

त्यजुन बिच्छोना तळी निजावे थंड पाहुन धरणी ॥

कडुक कोठे हरवले राहिले खुट अडकुन करणी ॥

काय परिक्षा बघू असली ज्वानी नवी तरणी ॥

इथे प्राण धाइना हवी मग महिन्याची वरणी ॥चा०॥

बाजुबंद काढू द्या दंड दुखती ॥

हे ओठ चुंबिता अति नाजूक सुखती ॥

दुजी राख ठिवा द्या आज लिहुन फारखती ॥चा०॥

अचुक लागले हाती चिरावली चोळी पतंगाची ॥३॥

कमाल खानी हार अमोलिक तुरे असेच राहिले ॥

येताक्षणी कवळिले असे कसे जिव व्याकुळ जाहले ॥

नवल नव्हे वावगे रंगाचे श्रमसारे साहले ॥

उदंडदिशी जिवलगा मुक्याने आज ठरता पाहिले ॥

घर्म दाटला मला तुम्हाला स्तन दोन्ही वाहिले ॥

हेत धरुनिया बरे दाविले अंगी कंबर बाहाले ॥चा०॥

वंशवेल जाहला प्रियकरा पुरे ॥

मी शरण आले की जिथुन तिथे काही नुरे ॥

नित अशा विलासे चित्त स्त्रियांचे मुरे ॥चा०॥

झुरे बावरे तुम्ही बरी नव्हे चाल कुसंगाची ॥

महादु प्रभाकर म्हणे जाइना खोड निसंगाची ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP