मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
कोठे पाहू मी प्राण विसावा...

लावणी - कोठे पाहू मी प्राण विसावा...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


कोठे पाहू मी प्राण विसावा । शोध कुणाला तरि ग पुसावा ॥धृ०॥

नव्हते ठाउक उष्ण जयाला । केले प्रवासी कुणि ग तयाला ॥

ममता कैची ग त्या निर्दयाला । वाटुनि प्याला कसा ग भयाला ॥

जाते धुंडित भेटायाला । काय करू सुन्या देवालयाला ॥चाल॥

झुरझुरू पाझर झाले कंठी उरला प्राण ।

फिरवा मागे जाउनी की घालुनी गळ्याची आण ॥चाल॥

सरला जाउन मास विसावा ॥१॥

गेले पाखरू माझे कुठे ग । काय प्रवासी ते द्रव्य लुटे ग ॥

पहाता यौवन छाति फुटे ग । अग्न देहातुन रात्री उठे ग ॥

स्मरता सौख्य ते कंप सुटे ग । तिळ तिळ काळिज शोके तुटे ग ॥चाल॥

किती गुण आठवू राजसा कल कल करिते अनिवार ।

जाना सख्यांनो धाउन फिरवुन आणा सकुमार ॥चाल॥

वाटे येउन पलंगी वसावा ॥२॥

केल्या छावण्या गंगातिरी ग । नाही सखे आता गोष्ट बरी ग ॥

चंद्र राहिला माझा दुरी ग । वेधित नेत्र चकोरापरी ग ॥

मर्जी फारच स्वामीवरी ग । येता नये म्हणून घरी ग ॥चाल॥

चिंता करते अहर्निशी फारच झाले रोड ।

जन्मा येउन केली म्या सावळ्या सख्याची जोड ॥चाल॥

त्याचा माझा वियोग नसावा ॥३॥

नवते जेवित स्वामी अधी ग । शयन केले मी दूर कधी ग ॥

पडले पर्वत दोघा मधी ग । वीष कुणी घातले दुधी ग ॥

गंगु हैबती गुण निधी ग । ते ही न सांगती गोष्ट सुधी ग ॥चाल॥

महादेव गुणीचे बोलणे रसिक रशेले गोड । प्रभाकर कवनी रस भरी काय इतरांनी करावी तोड ॥

सखये अक्षयी लोभ असावा । हेत उभयता प्रीतिचा ठसावा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP