मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
भोग ज्वानी कवळी । आली हो...

लावणी - भोग ज्वानी कवळी । आली हो...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


भोग ज्वानी कवळी ।

आली हो वर्षाची दिवाळी ॥धृ०॥

करुन श्रृंगार उभी मी नटून ॥

द्या हो आदराने आलिंगन उठून ॥

नका दूर धरू सख्या मर्सी विटून ॥चाल॥

या हो जवळी ॥१॥

दिवाळी सण मंगलदायक ॥ सुगंध न्हाती नारी नायक ॥

घरोघर खेळती गाती गायक ॥चाल॥

राग सकळी ॥२॥

मुख्य आज मुहुर्त भर पाडवा ॥ म्हणुन हात घेउन मधी आडवा ॥

केव्हांची हो करते लाड गोडवा ॥चाल॥

वदन कमळी ॥३॥

चरणी लागते करुणासागरा ॥

पहा पहा उदार गुण आगरा ॥

आता आड शीतळ मैलागरा ॥चाल॥

सोड सगळी ॥४॥

गंगु हैबती सबल धिरवान ॥

महादेव गुणिराज गुणवान ॥

प्रभाकर कवीवर मेहेरबान ॥चाल॥ कृपा आगळी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP