मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
कारे मजवरी हरि कोपलासी । ...

लावणी - कारे मजवरी हरि कोपलासी । ...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


कारे मजवरी हरि कोपलासी ।

हात धुवुनि कसा पाठि लागलासी ॥ध्रु०॥

नाही सुख पाहिले कधी या जीवाने ।

कसी धाव घेतली दैवाने ॥

अंतर पडिले सांबशिवाने ॥चाल॥

काय आग लाऊ मी गोतगणाला ।

पाहू पलंगी सखे आता ग कुणाला ॥

लौकर पाठवा पतिला आणाला ॥चाल॥

मज घरी टाकुनी कोठे राहिलासी ॥१॥

दिवस पावसाचे आभाळ गडाडे ।

ठाई ठाई उठती विजांचे कडाडे ॥

पाहुनी काळिज माझे धडाडे ॥चाल॥

उद्या भरतिल नद्या देश दुरावा ।

खबर लागेना ग लोक परावा ॥

कुठवर आपुला जिव आवरावा ॥चाल॥

नवी नवती आली बहार फुलांसी ॥२॥

षड्‌रस जेविता घास पडे ग ।

श्रृंगार घालिता उमेदी चढे ग ।

खेळता गंजिफा येते रडे ग ॥चाल॥

ताईत कंठिचा प्राणविसावा ।

नवे तरणेपणी गृही का नसावा ॥

समाचार स्वामिचा कुणाला पुसावा ॥चाल॥

सुखास नये गडे सुगंध विलासी ॥३॥

मौज खुशालित रहाली कराची ।

सोडली आस मी भरल्या घराची ॥

आजवर पाहिली वाट वराची ॥चाल॥

म्हणे गंगुहैबती वाट मिठाई ।

घाल मिठी उठ पतिचे तु पायी ॥

महादेव गावन जाणते शाई ॥चाल॥

प्रभाकर गातसे सदा दिल खुलासी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP