मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
लाव खंजीर सिर काट धरू । ...

लावणी - लाव खंजीर सिर काट धरू । ...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


लाव खंजीर सिर काट धरू ।

धिर धरवत नाही ॥ध्रु०॥

डाग लगाके पिहू पाछे ।

मज टाकुन गेला ॥

यार कहो तुम तोबी गुव्हा ।

कधी त्याचा केला ॥

कोन जगा प्यारा किसीने ।

गळ घालुन नेला ॥चाल॥

वार कलिजे पार लगा ।

कशी वाचेन बाई ॥१॥

बाल सुकावत कल खडीथी ।

आले धाऊन द्वारी ॥

कोन सुहाने अमीरनकी ।

गेली हिकडुन स्वारी ॥

देख पिहूंकी याद हुई ।

झाले विव्हळ भारी ॥चाल॥

चैन नही दिन रात ।

होती शरीराची लाही ॥२॥

उठ अकेले छोड सबी ।

गेले प्रियकर कोठे ॥

देस बिराना है लंबा ।

मधी पर्वत मोठे ॥

लोक लुगाया मै सुंती ।

बाई तिकडिल खोटे ॥चाल॥

गुन्हा नही कोई बात हुई ।

मजपासून काही ॥३॥

धार लगी क्या मेहू बरसे ।

आला श्रावण महिना ॥

डाल दिखाऊ ज्यान किसे ।

काय घालुन गहिना ॥

लाल सलामत रहो मेरा ।

मंदिरचा ऐना ॥चाल॥

छंद मीटे परभाकरके ।

छाप करून पाही ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP