मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
सकल दिवस दुःखाचे भासती आज...

लावणी - सकल दिवस दुःखाचे भासती आज...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


सकल दिवस दुःखाचे भासती आज सखे सरले ।

आज सखे सरले, मनोरथ पुत्राचे पुरले ॥धृ०॥

पूर्व सुकृतावरून धावण्यादेव त्वरित धावला ॥

सकल संकटे निरसुन समयी गणपती मज पावला ॥

वंशवनामधी अशोक करता अक्षय वट लावला ॥चा०॥

बळजोर पतीचा सारी रात्र साहिला ।

पूर प्रेमरसाचा एकांतात वाहिला ॥

सहजात सुमुहुर्ती गर्भ उदरात राहिला ॥चा०॥

निरी बरिच उंचावली ॥ कुस कंबर रुंदावली ॥

पडेल क्षणिक सावली ॥चा०॥

बाई दिसंदिस मज फार आशा सूटली ॥

श्रीहरी कृपेने कचणिच तूटली ॥

भारी पेट निराशा आशेनं हाती लूटली ॥चा०॥

झाले निर्मळ माझे सुख ॥ दाव देवा मुलाचे सुख ॥

नको नको मुलीचे दुःख ॥चा०॥

आताच मेली भूक बरोबर पाच मास भरले ।

पुढे गडे चार मास उरले ॥१॥

कोण पुरुष भाग्यवन माझ्या उदरी करी चळवळ ॥

सधन तपस्वी रणशूर जन्मा येतो कुणी केवळ ॥

घडोघडी वाटे हौस कधी करी सरसाविन जावळ ॥चा॥

परिधान करावे सफेत जरिपातळ ।

वनी व्रतस्थ रहावे वन पाहुन शीतळ ॥

जिंकावे स्वता संपूर्ण रणी भूतळ ॥चा०॥

असे होतात मज डोहाळे ॥

पुरवाग सकल सोहाळे ॥

द्यावे दान कनक कोहाळे ॥चा०॥

सहा सरुन सातवा भर महिना फाल्गुन ॥

पहाचिना सख्यांनो पोटपाठ मागुन ॥

महाफळ मिळविले रात्रंदिस जागुन ॥चा०॥

पुरे पुरे डोहळे जेवण ॥

नित नवी जिवा वणवण ॥

स्वरुपाची अडस ठेवण ॥चा०॥

दृष्ट होइल दारुन म्हणुन मनी कुतर्क संचरले ।

सबलग्रह नाही अजुन फिरले ॥२॥

सबर घोड्या म्हशी गाभण्या दुर बांधा नेउनी ।

चतुर स्त्रिया जाणत्या शोध लाउन या कुणि घेउनी ॥

गुज गोष्टि सांगेन तयाला सुखसंग्रही ठेउनी ॥चा०॥

जेविता जेवण गमे कडु काढा रासणा ।

चार चार दिवस नाही अन्नावर वासना ॥

जड झाले शरीर ही तळमळ कळ सोसेना ॥चा०॥

हा कठिण मास आठवा ।

मूळ माहेरास पाठवा ॥ गणगोत आप्त आठवा ॥चा०॥

कधी पुत्र प्रसवशील प्रियकरणी लौकरी ॥

म्हणुन लिंबलोण घरी भ्रतार तिंदा करी ॥

बैसल्या रुसुन समजाउन धरती करी ॥चा०॥

काय काय सगुन आठवू ॥

कोणती नजर पाठवू ॥

कुठे सौख्य सखे साठवू ॥चा०॥

नटुन थटुन करि धरी उठुन असेपंच प्राण मुरले ।

उतरले भार शिरावरले ॥३॥

नऊ मासांवर नऊ दिवस पळेवर पुरी पंधरा भोगली ॥

तीथ वार नक्षत्र मास शुभ योग सर्व चांगली ॥

लवकर जहाला कोन बाळ बाळंतिण नाही भागली ॥चा०॥

श्रृतकरा उठा प्रियकरास कुणी येक्षणी ।

पहा बाळ येउन चिद्रत्‍नदीप दक्षणी ॥

प्रतिबिंब तुझे लेकरू बत्तीसलक्षणी ॥चा०॥

दूध-मध मुलास पचविती ॥ आपआपल्यापरी रुचविती ॥

राव सभेस गुज सुचविती ॥चा०॥

गंगेत उडी घ्या सुंदर नारायणी ॥

उसळता बिंदु बहु पुण्य उत्तरायणी ॥

गत घेती पितर शूर प्रपंची पारायनी ॥चा०॥

पाचवी पुजा प्रियकरा ॥ दणक्याने बारसे करा ॥

घरोघर वाटा शरकरा ॥चा०॥

गंगु हैबती कवी महादेव गुणी जगात ठरले ।

प्रभाकर म्हणे वैरी हरले ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP