मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
संत श्रीमुक्ताबाईचे अप्रसिद्ध अभंग

संत श्रीमुक्ताबाईचे अप्रसिद्ध अभंग

संत श्रीमुक्ताबाईचे अप्रसिद्ध अभंग


पहिली माझी ओवी । प्रातःकाळ होतां । गाईला विधाता । त्रिकूटीचा ॥१॥
त्रिकूटीचा देव । आचार - क्रिया शक्ति । स्थूल देहीं वर्तती । रक्त - प्रभा ॥२॥
रक्त - प्रभा पृथ्वी । आउट हात जाण । आउट ताळ गगन । दीसताहे ॥३॥
दीसताहे लिंग । गुरू तो सूक्षम । आंगुष्ट मात्र वर्ण । शुभ्र वर्ण ॥४॥
शुभ्र वर्ण आप । ज्ञानशक्ति पाहे । श्रेद्धाहीन रहे । विष्णुभक्त ॥५॥
भक्त रूद्र तीसरा । सिंवलिंग कारण । द्रव्यशक्ति स्थान । तेज तत्त्व ॥६॥
तेज तत्त्व पाही । महाकारण तो । ईश्वर करतो । सेवा त्याची ॥७॥
सेवा त्याची घेतो । नीळकंठ ओंकार । प्रमाण मसूर । दीसताहे ॥८॥
दीसताहे लिंग । अती गौरवर्ण । वायोचें स्फूरण । तयांतूनी ॥९॥
तयांतूनी वाटे । पुण्याद्री पर्वत । भ्रमर गुंफानाथ । पाहावया ॥१०॥
पाहावया जावे । प्रसादलिंगासी । विराटनिवासी । पीतवर्ण ॥११॥
पीतवर्ण पाही । कैवल्यधारक । महत्शक्ति देख । त्याचें स्थळी ॥१२॥
त्याचें स्थळीं उभा । लक्षीत बैसला । लक्षातीत जाला । अलक्ष तिथे ॥१३॥
दशदिशा वेगळा । नित्य निरंजन । निशब्दीं हे खूण । वोळखावी ॥१४॥
निवृत्तीप्रसादें । बोले मुक्ताबाई । अनुभवाचे डोहीं । स्थिरावलीं ॥१५॥
( भा. इ. सं मं. चै. १२.४. मधून )

संत श्रीमुक्ताबाईचे अप्रसिद्ध अभंग समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP