मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
दासोपंत ओंव्या

दासोपंत ओंव्या

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


ग्रंथ परम दुस्तर तो (गीतार्णव), तयाचि (दासोपंतांस)
जसें न वासवाला (इंद्राला) ख (आकाश) ।

तें कैसें पां आमुते नकळें । आम्ही तंव नहों आंधळें ।
अविवेक, मदें मातले । आततायी ॥२५८३॥

व्याघ्र देखोनी पळावें । हे काये लागेल सिकवावें ? ।
पश्वादिकांहीं बरवें । टावेंचि असे ॥८४॥
परीक्षा न पाहिजे विषाची । माळा न लेईजे भुजंगाची ।
संगति तया चोराची । धरुंची नये ॥८५॥

न कीजे वैरियेसीं येकांतु । न सांगिजे खळा आत्मस्वार्थु ।
पाहोनि येकु पुरुषार्थु । कर्म करावें ॥८६॥

न कीजे साधूसीं मत्सरु । परबाधकाचा अंगीकारु ।
सत्यासत्या वेगळा विचारु । करुंचि नये ॥८७॥

न विश्वासावें दुर्मित्रा । वाउगी न करावी यात्रा ।
आपलें वित्त तस्करा । सांगोंचि नये ॥८८॥

इष्ट देखोनि प्रवर्तावें । अरिष्ट देखोनि परतावें ? ।
मा हें तंव ठावें । भाळकांहीं ॥८९॥

आइकोनि जाणों, देखोनि । विचारें मनामाजूनि ।
तरी कुळक्षया पापापासूनी । कैसें न परतावें ? ॥९०॥

प्रलय काळींचा हा बणवा । परतें परतें वासुदेवा ॥
गोत्रवधु हा पांडवा । प्रासूं आला ॥९१॥

हें सिंहवदन पसरलें । आंग चुकवावें आपुलें ।
पाप दारुण पावलें । नीघ वेगीं ॥९२॥
विषाचा हा सागरु । प्रलय काळींचा पूरू ।
कृष्णा तूं होसी तारूं । तरि नीघ वेगीं ॥९३॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP