मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
मुक्तेश्वरांची कविता

मुक्तेश्वरांची कविता

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


आजीपासोनि सातवे दिवशीं । तक्षकदंशें मरण त्यासी ।
अन्यथा माज्ञिया वचनासी  । करूं न शके हर ब्रम्हा ॥
म्हणे “अनुचित केलें कोपें । राजहत्या जोडिली शापें ।
राहटीपासोनि मनसंकल्पें । काय न करी प्राणिया ? ॥
निंद्यानिंद्य कर्म जितुकें । मनुष्यापासोनि घडे तितुकें ।
यालागी विचारी नरें सात्त्विक । भूतद्रोह न करावा ॥
विश्व हे अवयव आपुले । यांहीं केल्या आपण केलें ।
ऐसें साचार जया कळलें । तोचि निश्चयें जगदात्मा ॥
पराचे अपराध करणें क्षमा । हेंचि भांडवल तपियां आम्हां ।
क्रोधें धरितां अक्षमा । अक्षम होती साधनें ॥
प्रजापाळक स्वधर्ममूर्ति । ऐसा राजा विवेककीर्ति ।
शापिला हा पुढतपुढती । खेद वाटे मज पुत्रा ॥
शमीकचरणीं माझें मौळ । ठेविलें सांगा सहस्रवेळ ।
माझिया अपराधाचें फळ । याहूनि विशेष पाहिजे ॥
स्वकृतदोषें पावलों व्यसना । तथापि दीनावरी करावी करुणा ।
तेणें परलोकीं तरी गहना । कल्याणातें पावेन ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP