मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
नागेश कवि

नागेश कवि

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


‘माझे घरीं बाइल पाहिली ते ।
ते पायली अन्न उभ्याच खाते ॥
निर्लज्ज मोठी, गळताती कक्षा ।
मला असे सुंदरिची अपेक्षा ॥
‘एकाक्ष कार्यास अदक्षताही ।
नाकास पाहों तरि ठाव नाहीं ॥
प्रत्युतरें दे, वचना न साहे ।
या कारणें अन्य वधूस पाहें’ ॥
‘अदंत माझे घरिंचीच पाहें ।
नांवे मृगाक्षी परि अंध आहे ॥
हातीं खुली लंगित फार चाले ।
ऐसें वधुनें मज काय चाले ?’॥
‘दे मला भाकरी घेतसे चाकरी ।
मी करीना जरी लाथा मारी तरी ॥
कोण आहे घरीं दाद माझी करी ?।
स्त्रग्विणी नोवरी आजि कां नो वरीं ?॥
‘अंगी खर्बडता, पदास पृथुता, वक्त्रीं वसे प्रेतता ।
कंठी घर्घरता, कटीस पृथुता, वक्षस्थळीं शून्यता ॥
नाकीं उद्वसता, वदे कठिणता, चित्तांत नि:शंकता ।
हस्तीं तस्करता, असे गुण जिचे ते नावडे तत्वता ॥
अंगीं कोमलता, करीं कमलता, वाणीस पीयूषता ।
पायीं पद्मयुता, महाचतुरता, वक्षस्थळीं पूर्णता ॥
नाकीं सुंदरता, मुखीं विमलता, नेत्रांस आकर्णता ।
चित्तीं निर्मलता, असे गुण जिचे ते आवडे तत्वता ॥

कोणी वदे सत्य म्हणे तिजा रे ।
“आम्हांसि येतें बहुसाल शारें ॥
त्याची असे आजिच झाक पाळी”।
म्हणोनि बांधे पटका कपाळीं ॥

कोणा मनीं विंशति नेत्रशंका ।
वस्त्रांत येते मग मूत्रशंका ॥
आम्हासि पाहा अति शैल्य झालें ।
या कारणें वस्र भिजोन गेलें’ ॥
“दोघी स्त्रियांच्या बहुसाल संगें ।
मी फार कामी रतिरंग रंगें ॥
या कारणें हें दुरुनीच पाहें ।
नाहीं तरी हें धनु काय आहे ?”॥
धनुष्य आधीं धरितां मरावें ।
सीतेसि कोणें मग हो वरावें ?॥
पोटांत झाला बहु शूळ पाहा ।
धावोनियां साधक वैद्य बाहा ॥
बिंदूचे परि सिंधु मानित असें; पृथ्वीस बांधो पुडी ।
मेरू सर्षपतुल्य भासत असे, आभास घालीं घडी ॥
दिकचक्रें घटिकेंत आक्रमितसें, वासूस मुष्टी धरीं ।
कैलासापुरि कंदुकापरि करीं, देवांसि बांधीं घरीं ॥
पुष्पे आणित इंद्र चंद्ररविला दीपप्रचर्या घडे ।
ब्रम्हा वेद पढे, जळाधिप जळें आणोनि घाली सडे ॥
वारा झाडितसे स्वयें, पचन तैं विश्वानराला पडे ।
द्वारा पाळित काळ, रांड सटवी ते बंदिखानीं रडे ॥
विन्घें वारितसे गणेश: नगरी विष्णू समुद्रांतरीं ।
शेषाचा मणि मंडपांतरिं रुता ईशान वेत्रा धरी !
इंद्राणीप्रमुखा करीति सदनीं योषांस वेणीफणी ।
हें तों कांबिट केवढें मजपुढें कैसें चढेना गुणीं ॥
आकाशास महीतळीं धरिन मी वृथ्वी नभोमंडळीं ।
मृत्यूची मुरडीन थोर नरढी घालीन पायातळीं ॥
कृर्माचे कवटीस काढुनि दिवा लावीन त्या भीतरीं ।
तारामौक्तिक वोढुनि मग तुरा खोवीन वेगें शिरीं ॥
ब्रम्हांडासि करीन दोन शकलें भेदोनियां मी नखीं ।
काढीं दिग्गज - कातडी उचटुनी लावीन त्यांचे मुखीं ॥
काळाचे भुजदंड ते कुडपुनी वाजे दमाम झणीं ।
आतां कांबिट रोकडेम धडफुडें मोडीन येक्या क्षणी ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP