मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
विष्णुदास नामा

विष्णुदास नामा

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


अपूर्व द्रोणपर्वींची कथा । लाधव बहुत युद्ध करितां ।
दत्तचित्त परिसावें श्रोता । म्हणे नामा पाठक ॥

राजा नगर प्रवेसला । राजभुवनासि गेला ।
दाबोपासावोम दिधला । लोकां सन्मानु केला बह्नुतु ॥
मग बोलाविलें कंकभटासी । बहुत सन्मानिलें तयासी ।
वस्त्रें अलंकार तयासी । बलवासहित वाता झाला ॥
ते न घेती पतिकरु । म्हणती येऊं द्या उत्तरु ।
मग समारंभु करूं थोरु । नव्हे हा अवसरू आतांचा ॥
ऐसें कंकभटु बोलिला । तंव रायें सारिपाटाचा खेळु मांडिला ।
तंव उत्तरु जवळी आला । गजरु आइकला । तुरांचा ॥
वैराटु कंकभटातें म्हणे ?। आम्ही गेलों दक्षिणे ।
तेथें आम्हा आलें उणें । मग आलें सोडवणें बलव देखा ॥
येकला उत्तरु उत्तर गेला । तेणें दुर्योधनु जिंकिला ।
वेरूं मांडिला । सात क्षौणी ॥
यावरि कंकभटु बोले । तुम्ही सुशर्मयासी जिंकिलें ।
ऐसें  बोलिले, युधिष्टिरु ॥
ऐसें उत्तर धर्में केलें । तें जिव्हारीं लागलें ।
ते व्हेळीं हातिंचे फांसे टाकिले । रायें कोपें बहुतें ॥

‘येई वो विठ्ठले माझे माउलिये ।
निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहें ॥
आलिया गेलिया हातीं धाडीं निरोप ।
पंढरपुरीं आहे माझा माय बाप ॥
पिवळा पीतांबर कैसा गगनीं झळकला ।
गरुडावर बैसोनि माझा कैवारी आला ॥
विठोवाचें राज्य आम्हां नित्य दिवाळी ।
विष्णुदास नामा जीवें भावें ओवाळी ॥

आम्ही न बोलों लटकें । अवघें वर्तमान खोटें ॥ध्रृ०॥
मूंगी व्याली शिंगी झाली तिचें दूध किती ? ।
अठरा रांजण भरुनि ठेविले प्याले बारा हत्ती ॥१॥
तळ्यांत कांसव गीत गाय तडिवर कोल्हा नाचे ।
घेउनि कागद दौत लेखणी ळेंकडा पुस्तक वाचे ॥२॥
विष्णुदास नामा म्हणे ऐका याची ख्याती ।
जो लटिके म्हणेल त्याचे पूर्वज नरकीं जाती ॥३॥

“यावरी बोले ब्राम्हाण । सैंवरीं केला असे पण ।
कढईमाजी तेल घालुन । वरील लक्ष मांडिलेंसें ॥
वेळुवि बांधिलासे मासा । तयाचा वेग फिरे कैसा ।
द्दष्टिसी न दिसे सहसा । अवघड असे ॥

ऐसी पुण्यपावन कथा हे । सत्रा दिवस चालली आहे ।
तितुकें कापड शुद्ध होय । सत्रा ब्राम्हाण ऊठिले ॥
एक हात असे उरला । एक ब्राम्हाण असे राहिला ।
त्म्व दिवस उगवला । अठरावा तो ॥

होसी भक्तांचा कोवसा । तुझी ब्रीदें हृषीकेशा ॥
निवविले सायासा । कृपासिंधु मुरारी ॥१॥
अंबऋषी कारणें । दहा वेळ गर्भवासा येणें ॥
अवतार धरिला नारायणें । गजापुरनगरी ॥२॥
अंदुरायाच्या घरीं । बाळ सेनाच्या कुमरी ॥
मत्स्यरूप अवतार धरी । वेद हरण कैवारी नारायण ॥३॥
विद्यापुरा नगरी । अंधरु राजा राज्य करी ॥
श्रिया देवी त्या सुंदरी । उदरीं कुमरू जन्मला ॥४॥
पृथ्वी स्रसातळ वटी । जातां थोर अंदोळली सष्टी ।
धांवण्या धांवले जगजेठी । धरा पृथ्वी सांवरली ॥५॥
मर्गजपुरीं पुरपति । हिरण्याक्ष चक्रवर्ति ॥
अग्नि असे जनवंती । घरी बाळ वराह ॥६॥
त्रिदशदेव श्रिया चाडा । हिरण्याक्षवधिला गाढा ॥
भूगोल धरोनि दाडा । केला निवाडा स्वर्गींचा ॥७॥
कर्पूरपूर पाटन । हरिभक्तीचें हें स्थान ॥
सदया देवीप्रिया नंदन । उदरीं नृसिंह जन्मला ॥८॥
पित्या पुत्रा झाला कळी । स्तंभीं प्रगटला तयेवेळीं ॥
असुर मारिला करकमळीं  । भक्त प्रल्हाद रक्षिला ॥९॥
कश्यपनंदन वर्धन । कोवळा दयेचा वामन ॥
खुजट रूप धरुन । महेन्द्रपुरीसी आला ॥१०॥
दानें तपें व्रतें बळी । तोहि घातला पाताळीं ॥
अद्यापि राहिला जवळी । चरणतळीं पद देऊनि ॥११॥
रेणुपुरी देवी रेणुका । लाधला जमदग्नीस देखा ॥
तिचे उदरीं विश्वतारका । परशुराम जन्मला ॥१२॥
अस्रुरी वधियेली माया । म्हणें धांवें पुत्रराया ॥
अवचित पातला धांवया । सहस्रार्जुन मारिला ॥१३॥
अयोध्या नाम नगरी । जन्म कौसल्ये उदरीं ॥
देव भक्तांचा कैवारी । दशरथ नंदन राधव ॥१४॥
राम त्रैलोक्यीं वीर दारुण । तेणे वधियेला रावण ॥
अढळपद देऊनि । राज्यीं बिभीषण स्थापिला ॥१५॥
मथुरा नामे नगरी । वसुदेव देवकीं उदरीं ॥
कृष्ण आठवा अवतारी । लीला विग्रही जन्मले ॥१६॥
कंस चाणूर मर्दले । यमलार्जुन उन्मळिले ॥
सप्त गर्भाचे सूड घेतले । रक्षीले गाई गोपाळा ॥१७॥
बौद्धा- श्रीवत्साच्या घरी । जन्म शांभवीच्या उदरी ॥
राजा कांतीये नगरीं । निरंतरे राहिला ॥१८॥
घ्ताबमुद्रा मांडुनियां । वस्त्रें शस्त्रें त्यजुनिया ॥
राहिला पै निरंजनिया । भक्तिभाव ओळखे तो ॥१९॥
कल्की जशरायाचा पुत्र । सावित्री देवीचा कुमर ॥
शंभलापुरीं करी अवतार । दाहिरूपें प्रगटला ॥२०॥
असा अमूर्त मूर्त विटेवर । उभा राहिला निरंतर ॥
विष्णुदास नाम्याचा दातार । वर विठ्ठल पंडरिये ॥२१॥

N/A

References : N/A
Last Updated : April 03, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP