मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
मुक्तेश्वरांची कविता

मुक्तेश्वरांची कविता

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


हांक मारिती याज्ञसेनी । कंपें थरारिली मेदिनी ।
खचोन पडों पाहे तरणी । चंद्रतारांसहित ॥
आंदोळला गिरि कैलास । ढळला वैकुंठीचा कळस ।
देवांगना मानूनि त्रास । शोक करिती आक्रोशें ॥
उमा रमा रेणुका सती । लोपामुद्रा अरुंधती ।
क्षोमोनि उदक घेती दाती । शाप मुखें वदावया ॥
म्हणे क्रोध नावरे तुझिया चित्ता । तरी गदा ओपीं माझिया माथां ।
परी असत्यदोष कुंतीसुता । स्पर्शे ऐसें न करावें ॥
सत्य रक्षावया श्रीरामें ।अरण्य सेविलें पुरुषोत्तमें ।
पिता प्राणें गेलिया, सीमे  । नुलंघीच मर्यादा ॥
लटिकें साच करूनि स्वप्न । राज्य ब्राम्हाणा दिधलें दान ।
तया हरिश्चंद्राचें कथन । ग्रंथकर्ते बोलती ॥
कपोत शरणागत पातलें । शिबीनें निज मांस छेदिलें ।
दधीचि ऋषीनें दीधलें । देहदान द्विजातें ॥
तैसें येथें अवघड कायी । विचारीं तूं आपुल्या हृदयीं ।
सत्यनिष्ठातेम अपायीं । ईश्वर न घाली सर्वथा ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP