TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
मुक्तेश्वरांची कविता

मुक्तेश्वरांची कविता

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


मुक्तेश्वरांची कविता
म्हणे, ‘विधातिया मूर्खा । काय रेखिली कर्मरेखा ? ।
आम्हां ऐशा अभाग्यपुरुषां । काय म्हणोनि निर्मिलें ? ॥
कुंतिण्भोजाची नंदिनी । वसुदेवाची पवित्र भगिनी ।
राया पांडूची वीरपत्नी । स्नुषा विचित्रवीर्याची कांता ।
भूतळीं लोळे प्रेता ।  तुल्य दिसे मज द्दष्टीं ॥
सत्यशील पवित्र परम । पुण्यश्लोकांमाजी उत्तम ।
धर्मस्वरूप राजा धर्म । कर्म भोगी केवढें ? ॥
ज्याचिये उपमे त्रिजगतीं । भार्गवराम कीं दाशरथी ।
तो हा अर्जुन वीर क्षिती । लोके रंकासारिखा ॥
ज्यांचिया रूपा वेधोनि पुढती । देवांगना न लाविती पातीं ।
चातुर्या लाजोनि सरस्वती । पांडुरवर्ण विवर्णा ॥
ते हे माद्रीकुमर दोन्ही । अतिसकुमार सर्वगुणी ।
स्यमंत आणि कौस्तुभमणि । जेंवि कां धुळीनें लेपिले ॥
याहीपरतें थोर दु:ख । भोगिलें आणि भोगिती लोक ।
परी हें सर्वथा न घडे देख । एका पांडावांवेगळें ॥
वोश्ववनिता हो ! पवित्र । पोटीं प्रसवावा सभाग्यपुत्र ।
रूपविद्याबळपात्र । काज नाहीं ययाचें ॥
रूप विद्या बळ वरिष्ठ । त्या आम्हां पांडवां ऐसी वाट ।
इतर मानवांतें कष्ट । काय होती कळेना ॥
भाग्यरेखा नसतां भाळीं । वंध्या विद्याकळा सकळी ।
जैंसी प्राणेंवीण मोकळीं । काय करावीं इंद्रियें ? ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-04-06T05:57:09.1970000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

hive

  • न. पोळे 
  • न. मधुमक्षिकालय 
  • न. मधुमक्षिकालय 
  • स्त्री. गजबजलेली जागा 
RANDOM WORD

Did you know?

घरातील देव्हारा पूर्व पश्चिम कां ठेवतात, इतर दिशा कां वर्ज्य?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.