मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
मुक्तेश्वरांची कविता

मुक्तेश्वरांची कविता

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


शेष वेंचिता अठरा घटिका । पूर्वदिशेनें क्षाळिलें मुखा ।
कुंकुम रेखिलें त्या तिलका । अरुणोदय बोलिजे ॥
भार्गवाचार्य उदया येतें । तंव अपार क्रमूनियां पंथ ।
पुढें जान्हवीजळाचा वात । शीतळ मंद पातला ॥
हस्त आवरितां कुमुदीं । अवमान मानिला षटपदीं ।
त्यांतें आदरें कोकनदीं । पाचारिलें जवळिके ॥
कुक्कुटरच करितां काका । भयें पळ सुटला उलूकां ।
भोग द्यावया चक्रवाकां । चक्रवाकी चालिल्या ॥
गाढालिंगनें पडली मिठी । सोडितां दंपत्यें होती कष्टी ।
वस्त्रें वेढिती परी पोटीं । अपूर्ण कामें जळजळ ॥
वेश्यागारा सोडूनि विट । लोकाचारा भिनले निकट ।
वामी कौळिक धूर्त शठ । वेष घेती शिष्टांचे ॥
घेऊनि अंधकाराची बुंथी । चंद्र स्वेच्छा भोगी जगती ।
प्रकाश वेढोनि सूर्याप्रती । म्हणे मी शुद्ध पतिव्रता ॥
भोग भोगूनि सांडिले राजे । नूतनातें उपजवी लाजे ।
भ्रम घालूनि म्हणे माझें । असे ऐश्वर्य अक्षयी ॥
गगनसमुद्रीं मुक्ताफळें । अरुणचंचुनें कनकमराळें ।
वेंचूनि घेतां कळाकुशलें । नाहींच केलीं नक्षत्रें ॥
कीं व्योमनर्मदेमाजीं थोर । कर्तवीर्य सहस्रकर ।
तारा वाणलिंगांचा भार । निवटोनि करी परौता ॥
कापडी चालिले तीर्थपंथें । सोऽहमस्मि’ चिंतिती ज्ञाते ।
भक्त स्मरती हरिहरांतें । प्रेमभावें आवडी ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP