मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
नामा पाठक

नामा पाठक

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


“माझा नमस्कार साधुसंतां । कृपादान दिजे आतां ।
मी सांगेन पुण्यकथा । ऐका सावध हौनी ॥
सकळ सुकृताची राशी । सिब्री राजा सूर्यवंशी ।
त्याची कीर्ति अविनाशी । तिंहीं लोकांमाझारी ॥
चंद्रासी अवगुण कळंकु । चंदन वेढिला विखारीं ॥
बहुत आहे उदंड कनक । तेथें असती विन्घें अनेक ।
सिब्रिरायाचे गुण अशंक । तिंहीं लोकांमाझारी ॥
एक देता एक देवतिता । परी आचेसि नाहीं मधुरता ।
ऐसे तीन्ही गुण विचारितां । येके ठाइं न मिळती ॥
कल्पतरु होय जरी चालता । आणि मेघ सदा काळीं वरुषता ।
तरी तो उपमा होय भंवता । सिव्रीराया सारिखा ॥
गणूं येती पृथ्वीचे कण । आणि गगनींचे तारागण ।
परि सिव्रिरायें केलें दान । तें कोणा न गणवे ॥
हेमाचळीं आहे कनक । सागरीचें उदक ।
पाहतां समान नम्हे एक । दान अधिक सिब्रि राया ॥

कपोसें मानिला विश्वास । म्हणे फावला बुद्धिप्रकाश ।
ऐका पुढील कथासौरस । पाठक नामा म्हणे संतां ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP