मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
मुक्तेश्वरांची कविता

मुक्तेश्वरांची कविता

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


ऐसे शकुंतलेचे बोल । रायें मानिले निरस फोल  ।
जैसा क्षपणक निरोधी झोल । पिकल्या मधुमोहृळाची ॥
चंपकपुष्पांचे सुवासशोभे । ग्राही न होइजे जेंवि रोलंबें ।
कोकनदांचीं चारु कदंबें । कुंजर सारी परौतीं ॥
नाना वेदींचे विधिवाद । चार्वाक म्हणती सर्वाबद्ध ।
उपनिषदांचा गुहयार्थभेद । वादी जेंवी अव्हेरिती ॥
तैसीं प्रियेचीं पवित्र वचनें । दुष्यंतें दूषिलीम आपुल्या मनें ।
म्हणे ‘हे बहुभाष कवणें । दुष्यतें दूषिलीं आपुल्या मनें ।
मातला हस्ती क्षोभला सर्प । भ्रष्टला ब्राम्हाण पेटला दीप ।
अमर्याद स्त्रियांचा जल्प । आवरूं न शके विधाता ॥
हीन जातीचिया लक्षणा । आतां जाणवलें या मना ।
मेनिका ते पण्यांगना । धर्मनिषिद्ध बंधकी ॥
नगरद्वारींचा दर्पंण । अवलोकितां निवारी कोण ? ।
विद्यामठीं रोंविला सहाण । काष्ट घांशी भलताचि ॥
भेरी मांडिली देउळीं । आवडे तेणें कांडावें ॥
जिचे उदरीं तव उत्पत्ति । तिची निवडिली ऐसी जाती ।
म्हणोनि ‘खाण तैसी माती’ । उखाणा लोकीं प्रसिद्ध ॥
यालागीं बोलती वडील वृद्ध । उभय कुळें पाहूनि शुद्ध !
कन्या पर्णावी प्रसिद्ध । जेवी पताका वंशासी ॥
क्षत्रियें घेतला ब्रम्हावेष । हा कोण जातीचा विशेष ।
शूद्र होवोनि परमहंस । म्हणे, मी ‘श्रेष्ठ संन्यासी’ ।
भोगूनि त्यागिती पुष्पमाळा । तेंविं निर्माल्य शकुंतला ।
शकुंतीं रक्षितां स्नेहाळा । श्रेय घडलें कण्वातें ॥
गळीं पडोनि विषयस्वार्था । संबंध लाविसी मज समर्था ।
अविचारबुद्धि सांडूनि आतां । जाईं स्वस्थळा आपुलिया

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP