मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
कळपूरकर विठ्ठल

कळपूरकर विठ्ठल

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


नारायणाचीं अगणीत नामें । नि:काम घ्यावीं अथवा सकामें ॥
आहे असा निश्चय विठ्ठलाचा । हा ग्रंथ केला हरिराधिकेचा ॥
गणपतिवरदानें स्फूर्ति अद्‍भूत आहे ।
मृदुपदरचनेचे श्लोकसाहित्य पाहें ॥
कुज म्हणतिल वाचा काय भाषा मराठी ।
परि सुरस जनांतें प्रीति होईल मोठी ॥
रात्रांदिवा वामनमूर्ति चिंतीं । तेणें अविद्या वसती दिगंतीं ॥
द्दष्टीस दूजें अणुही न दीसे । सर्वां स्थळीं ईश्वर एक भासे ॥
शब्द मार्‍हाष्ट्र कांहीं घडेना जना ।
हे पुराणींच बोलेति आणा मना ॥
बोलती मूर्ख वाक्यें अशीं सर्वथा ।
याचिलागीं मियां बोलिली हे कथा ॥
दर्शनाग्नि नयन स्थिर पाहें । सर्व पद्यरचना इतुकी हे ॥
जाणती चतुर ते रस याचा । ईश्वरार्पण वदे कविवाचा ॥
गोत्र श्रीवत्स ज्याचें श्रुति तरि दुसरी जीवनस्तंभ शाखा ।
व्यापारी वृत्ति ज्याची द्विरदगुरु असे त्यासि संतुष्ट देखा ॥
आचारें शुद्ध आहे सकळ कळपुरीं सर्वदा वस्ति ज्याची ।
तेणें हा ग्रंथ केला प्रकट तरि असे विठ्ठल ख्याति ज्याची ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP