मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
विठ्ठल चित्रकवि

विठ्ठल चित्रकवि

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


जल कंबुशे बहु पंक होय वाटे ।
नद नदी यांप्रति पूर फार दाटे ॥

धन दुर्दिनोत्तम मानला समग्रा ।
रस निपजे सखि वृत्त पुष्पिताग्रा ॥

यमुना वन माजविलें शरिरें ।
निजवैभव दाखविलें चतुरें ।

नवपल्लव शोभति ते बरवे ।
सखि ! तोटकवृत्त जगीं मिरवे ।

नदि यमुनेचें स्थिर बहु पाणी ।
क्षिति वनितेची सरळ सुवेणी ॥

नगपरिवेष्टित वल्लि पवित्रा ।
सखियांस वदे व्रज गोरटी ।

भ्रमता न पवे हरि संकटीं ॥
श्रमली न चले पद येधुनी ।

जन हो परिसा अतिशायिनी ॥
कुंडमंडपिं दिव्य उन्नत पादपीं तप योजिलें ।
क्षेत्र ह्द्वन पुण्यपावन मंत्रसाधन मांडिलें ॥

पद्मलोचन तापमोचन हेंचि चिंतन ते करी ।
छंद हा विवुधप्रिया वरि निश्रयात्मक वैखरी ॥

म्यां पूर्वार्जव साधिलें न तुमचे शास्त्रार्थ ना पाहिले ।
श्रीसारस्वतकाव्यनाटकरसालंकार ना देखिले ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP