मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
मुक्तेश्वरांची कविता

मुक्तेश्वरांची कविता

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


यापरी जनमेजया भूपति । सौप्तिक पावलें समाप्ति ।
पुढें स्त्रीपर्वाची स्थिति । कर्णनेत्रीं विलोका ॥
प्राकृत कवींचा वाग्जल्प । तैल कढईंत पाहनि रूप ।
फिरता मत्स्य सकंप । वामनेत्रीं विंधिला ॥
परी तें मूळ भारतीं नाहीं । म्हणोनि असो, न बोलों कांहीं ।
नलिकाछिद्रांतूनि पाहीं । यंत्र भेदोनि पाडिलें ॥
संसारार्णविं दुस्तरीं बहु बहू कामादिकीं पीडिलें ।
दंभोपाधिक नेममायिक सुखा दाराधनें गोंविलें ॥
विद्यावादवितंड जालकलनीं सर्वांसि गर्वाथिलें ।
पद्मावल्लभपाद सूलभ जगीं निर्धारितां मानलें ॥
‘एका जनार्दना शरण । उत्तरकांड रामायण ।
संतकृपेनें जालें संपूर्ण । सकळ लोकतारक ॥
पवित्र सरिता कृष्णा वेणी । पंचगंगा संगमस्थानीं ।
नृसिंहसरस्वतीचे चरणीं । ग्रंथप्रसाद लाधला ॥
तेथ जाली देववाणी । ग्रंथ पावावा प्रतिष्ठानीं ।
एकनाथाचिये सदनीं । विस्तारले जनसुखें ’॥
रावण म्हणे माझिये सरी । दुजा नुपजे पृथ्वीवरी ।
बाहू पिटोनि पुढारीं । वाट धरी महिजेया ॥
विमानीं लोटूनि शार्वरी । प्रात:कालाचे अवसरीं ।
माहिष्मती नाम नगरी । रेणातीरीं प्रसिद्ध ॥
तेथ राज सहस्त्रार्जुन । सहस्त्राकारांचा भुतलमान (?) ।
ज्याच्या द्दष्टी झुंजार आन । लोकत्रयीं जाण असेना ॥
विशाल नर्मदेचें पुलिन । बाणलिंग सुंदर गहन ।
विमानीं उतरोनी रावण । केलें स्नान विधियुक्त ॥
नित्य नेम सारूनि वोजा । रत्नसिंहासनीं गिरिजा ।
सहशंभु केली पूजा । आपुलिया कार्याकारणें ॥
अष्टदिशीं अष्ट रत्नदीप । दाविती चंद्रसूर्याची वोप ।
मंगल वाद्यें हो अमूप । रक्षोगणीं साक्षेपें वाहिलीं ॥
जांबुनद सुवर्णलिंग । तळी पटकुळे चांग ।
मंडपीं जोडिले पद्मराग । सुरंगरंगें झळकती ॥
न्यास ध्यानादि विधियुक्ती । रुद्रमंत्राच्या आवृत्ति ।
अकरा वेळां उमापति । शृंगोदकें अभिषेचिला ॥
शुद्धोदकें स्नान आचमन । धुवट वस्त्रें परिधान ।
त्यावरी लेपिले बावन । हरिचंदन मलयज ॥
कुंकुम चंदन कस्तूरिका । कर्पूरांग जवादी बुका ।
लेपुनियां गिरिनायका । पंचधान्यें अर्पिलीं ॥
लक्ष बेलाचीं सुपत्रें । चंपक मल्लिका शतपत्रें ।
नीलोत्पलें अतिपवित्रें । रातोप्तलें समस्त वाहिलीं ॥
अर्पिला दिव्य परिमल धूप । लक्ष वाती पात्रीं प्रदीप ।
अमृत फलांचा अमूप । महानैवेद्य अर्पिला ॥
तांबूल अर्पूनियां हातीं । प्रदक्षणा सहस्रवर्ती ।
संख्या लक्ष दंडाकृति । दंडवत निश्चिती घातली ॥
तया अंतरीं सरिताजळीं । सहस्र कामिनींच्या मेळीं ।
कार्तवीर्य जलकल्लोळीं । जलक्रीडा खेळतु ॥
रक्षणें ठेविलीं चहूं द्वारीं ?। महावीर शस्त्रधारी ।
वारा पक्षी हालता दुरी । विंधोनि करीं पाडिती ॥
जल रोधितां सहस्र करीं । तें फुगोनी चालिलें वरी ।
रावणलिंगाचें शिरीं । लोट आला अदूभुत ॥
“प्राकृत कवीश्वराचार्य । ज्ञानदेव ज्ञानैकवर्य ।
जयाचे बुद्धीचें गांभीर्य । अगाध सिंधूसारिखें ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP