मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
विठ्ठल चित्रकवि

विठ्ठल चित्रकवि

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


रामा  कैवल्यधामा न कळसि निगमा नेति वामांगिं रामा ।
जिव्हे श्रीरामनामावळि जपत उमाकांत चित्ताभिरामा ॥
देशी मोक्षार्थ कामामृत पद परमानंद तूं पूर्णकामा ।
नाना अन्याय सामाविशि तव महिमा जाणसी तूंचि रामा ॥

तदुपरि मुनि सांगे राज्य यांचें अयोध्ये ।
कुमर दशरथाचे, वीर हे चंड योद्धे ॥
दिनकर कुळ यांचें शिष्य होती वसिष्ठा ।
करणि रघुपतीची आइकें श्रीवरिष्ठा ॥३७॥

रक्षिला मख रघूत्तामें बरा । ताटिका उडविली दिगंतरा ॥
मूळपत्र तुमचें विलोकिलें । म्यां तदा शुभ मुहूर्य साधिले ॥
चालतां विपिन दाट लागलें । तें स्थळीं नवल वर्तंलें भलें ॥
शापिलें शिजकलत्र गौतमें । तारिलें पदरजें रघूत्तमें ॥३८॥

घेतां नाम समस्त काम पुंरवी श्रीराम तो हा असे ॥
आत्माराम गुणाभिराम भगवान सर्वांतरीं जो वसे ॥
राया ! तारक ब्रम्हा चिद्धन तुतें भेटावया आणिला ।
विष्णूचा अवतार सप्तम तुवां भाग्योदयें देखिला ॥३९॥

याचा बंधु सुमित्र यासम सखा शेषावतारी स्वयें ।
दोघे वीर पराक्रमी त्रिभुवनामध्यें बळी निश्वयें ॥
लीलाविग्रहि वेदनीतिमहिमा प्रत्यक्ष तो हा स्वभू’।
ऐसे उत्तर आइकोनि हृदयीं संतोषला तो प्रभू ॥४०॥

“वृक्षाच्या लांब शाखा कर चरण तसे पर्वतातुल्य माथा ।
दाहा तोंडें कराळें सचकित नृपती देखतीं लंकनाथा ॥
मोठा आजानुबाहो रजनिचरपती बोलता काय झाला ।
सालंकारें विराजे नवजलदतनू दर्प सर्वां नृपांला ॥४१॥

दुर्गा गणेश गुह नंदि शिव:सभेला ।
कैलास म्यां भुजबळें श्लथरूप केला ॥
तो मी धरीन पडतां नभ वामबाहें ।
कोदंड खंडिल असा नृप कोण आहे ? ॥४२॥

म्यां नाहीं नृप जिंकिला रणभुमीं तो कोण आला असे ?
माझा दर्प सुरेश्वरा भय बहू शेषासि माझें असे ॥
भूची घालिन मी घडी उतरडी पाडीन मीं स्वर्गिंच्या ।
पाताळें उकलूनि बांधिन सर्‍या लंकेचिया दुर्गिंच्या ॥४३॥

विद्या सत्कुळ भाग्यकीर्तिं सकळीं संपन्न मी भूतळीं ।
दंडीं खंडिन ये क्षणीं भुजबलें कोदंड भूमंडळीं ॥
पाहा मत्पुरुषार्थ, गर्जुनि उभा राहोनि तेथें करी ।
तो सीता उपरीवरी सहसख्या पाहे सभा सुंदरी ॥४४॥

तें इंद्रवज्रासम तुल्य भासे । लंकेश भूधूलि भुजांसि घांसे ॥
स्पर्शें सिताच्या बळहीन केलें । कोदंड तोली मग धैर्य गेलें ॥४५॥

देशावरीं संचित फार केलें । तें तस्करीं द्रव्य हिरोनिं नेलें ॥
झाला तसा न्यास दशाननातें । लज्जा नृपांची धिर दे मनातें ॥४६॥

ओढी चाप विसां भुजीं न गवसे तों मांडखुंटी बसे ।
जानू टेकुनि भूमिसी भुजबळें तोलूनि पाहातसे ॥
हालेना तिळमात्र, याउपरि तें कोदंड आलिंगिलें ।
पोटीं धाक न माय कंप सुटला गुल्फावरी आणिलें ॥४७॥

झोले तोले प्रतापें धरित विसभुजीं आणिलें जानुदेशीं ।
टेंका पृथ्वीसि ज्याचा शिथिल डळमळी नावरे साक्षपेंसी ॥

सर्वांगीं स्वेद दाटे धनुष उचललें वायु त्यासहय झाला ।
त्याच्या झोकें उताणा क्षितिवरि पडला नाद धात्रीं विझाला ॥४८॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP