मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
पंडित नारायण व्यास बहाळिये

पंडित नारायण व्यास बहाळिये

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


तया  देवयतना जवळिके । सरोवरें देखें सुलक्षणिकें ।
तेथ टाहुवा करिती चक्रवाकें । विरह कातरे ॥
निर्दोंष नि:पाप निर्मलें । वोसंडत परिपूर्ण जलें ।
सर्वांगें जालीं वाचळें । कळरवीं पक्षियांचेनि ॥
ठाइं ठाइं बरवट । निवृतमंडित घाट ।
जैसे प्रवृत्ति पांथावरी । तपोनिधि ॥
मंदें मळयानिळें । झगटलें पाणी हाले ।
तें मज पां सुखें ढोले । परमपुरुषाचेनि ॥
असो हे पोखरणी बावी । जेआ श्रीचरणकमळें बरवीं ।
देओनि गोसावी । बीजे करिती ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 07, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP