मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
मालो

मालो

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


कां रे अनाथबंधु येवढें कां केलें निर्वाण ।
किती अंत पाहशील माझा कंठिं राहिला प्राण ॥ध्रु०॥
ब्रम्हादि वंदिती पाय तूं त्रैलोक्याचा धनी ।
तुझा मी म्हणवितों मज कां चिंतेची कांचणी ॥१॥

सुवर्णाची लंका नेउनि दिधली शरणाशीं
वितभर पोटासाठीं तोंड वासूं कवणासी ॥३॥

मुक्तीच्या माहेरा ऋद्धिसिद्धि तुझ्या दासी ।
क्षीरार्णवा रंक मालो मरतो उपवासी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP