मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
मुक्तेश्वरांची कविता

मुक्तेश्वरांची कविता

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


‘इंद्रायणिचे तटीं धरिला रहिवास ।
विश्व तारावया लक्ष्मीनिवास ।
ज्ञानेश्वररूपें धरिला निज वेष ।
वर्म जाणे तया सदगुरु - उपदेश ॥१॥
जयदेव जयदेव जय ज्ञानदेवा ।
जीवा शिवा आदि परब्रम्हाठेवा ॥ध्रु०॥
कृष्ण एकादशी कार्तिकमासीं ।
आपण पंढरिनाथ सनकादिकांशी ।
यात्रेलागीं येती स्वानंदराशी ।
दर्शन घडे तयां निजमुक्ति देशी ॥२॥
महिषीपुत्र केला वाचक वेदांचा ।
प्रतिष्ठानीं गर्व हरिला विप्रांचा ।
विशेष अर्थ केला भगवद्नीतेचा ।
अजान वृक्ष पिंपळ शोभे कनकाचा ॥३॥
सकळ सिद्धगणांमाजी तूं श्रेष्ठ ।
ज्ञानदेवी अनुभव ज्ञान वरिष्ठ ॥
अनुताप ज्याचा विश्व घनदाट ।
मुक्तेश्वरीं न धरवे प्रेमाचा लोट ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP