मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
आनंदतनय

आनंदतनय

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


तों त्या सौधतटीं सख्यांस निकटी चांपेकळी आहे.
सीता सिंहकटी ससंभ्रम उठी कासे घटी गोमटी ॥
सज्जीं चालत सज्जनस्तुतगणा ते भव्य भागीरथी ।
पावे दाशरथी कृपाब्धिजवळी ते कोण लीला कथी ॥
ढोळे मीन विलोल ते तळपती हस्तांघ्रि पद्में नवीं ।
वक्षोजद्वय चक्रवाक कच ते भृंगालि ओघच्छवी ॥
शैवालावलि नीलरोमलतिका ते हंस वाटे नदी ।
वेंणी ते यमुना, सरस्वति गळां माळ, स्वयें स्वर्णदी ॥
सकलहि कलहंसीसारख्या चांगचाली ।
चमकति सखिया त्यांमाजि सीता निघाली ॥
उतरति तरुणांगी सौधसोपानमाला ।
निरखिति निजभावें आवघ्या राघवाला ॥
सहज जंव विलोकी श्री वराया वरा या ।
तहं निरखुनि डोळां देवरा देवराया ॥
हृदयिं बहु सुखावे पावली भावलीला ।
प्रणमन करि रंगीं तें धुनी मेघनीला ।
समजति मनिं जीतें योगिये योगमाया ।
अतिघन गतिनें ते शीघ्र येती नमाया ॥
अतुर तरि जशी ते जानकी रामचंद्रा ।
निरखि निज अपांगें योगि हृदब्योमचंद्रा ॥
हळुहळु अमलांगी गोरटी राजबाळी ।
जवळ जवळ आली डोलते घोंसबाळी ॥
स्वकरिं कुसुममाला घेऊनी त्या कृपाळा ।
धरुनि सुख - उमाळा, लक्षिती लोकपाळा ॥
आनंदें अळुमाळ लक्षित पदा वेल्हाळ त्या अंगणीं ।
लज्जानम्र मदालसा चमकतां कोल्हाळ भूतांगणी ॥
हांसे मंद अनालसा अलिकुलस्तोमालका मंगला ।
रंगीं भव्य तमालनीलविभुच्या ते माळ घाली गळां ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP