मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
मुक्तेश्वरांची कविता

मुक्तेश्वरांची कविता

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


“मंत्रबीजाक्षरांच्या ओळी अबद्ध  जपतां भद्रकाळीं ।
क्षोभे तैसी क्रोधानळीं । अंगार टाकी शब्दांचे ॥
पवित्र विश्वामित्रबाळा । शकुंतला अलिकुंतला ।
म्हणे ‘कुंतल मंडळपाळा’ । तूंचि अविचारें जल्पसी ।
तूं तंव भूचर विचरसी क्षिती । पाहें माझी सध्यां प्रतीति ।
श्रेष्ठा सावित्री गौरी पार्वती । साक्षी आणीन या ठाया ॥
अपरसृष्टीचा परमेष्टि । गाधिज मुनि निंदिसी दोषद्दष्टीं ।
हें ऐकोनी काय श्रेष्ठीं । श्रेष्ठ तुतें म्हणिजेल ? ॥
मागें एकासि बोलिजे न्यून । याहून अपराध तो कवण ।
निशेष समर्थ तपोधन । निंदितां अनर्थ रोकडा ॥
पराचे दोष न बोले मुखीं । तो मान्यता पावे उभय लोकीं ।
विष्णुदूत त्या मस्तकीं । वाहूनि नेती वैकुंठा ॥
कुरूप न पाहे आरसीं वदन । तोंवरीं वाहे रूपाभिमान ।
देखिल्या म्हणे अपार जन । रूपें विशेष मजहुनी ॥
वृद्धासि करितां अभिवंदन । साधु होती सुखसंपन्न ।
करूनि साधूचा अवमान । परम लाभ दुष्टातें ॥
दोष न देखती जे लोकीं । ते सर्वत्र सदा सुखी ।
दोषदु:खें स्वयेंचि दु:खी । दु:ख देती पुढिलांतें ॥
मुख्य साधूचें लक्षण । परदोष न वदे गेलिया प्राण ।
पैशुन्य बोले कारणेंविंण । तोचि दुर्जन दुरात्मा ॥
नरसिंहा सोडोनि कपट । मांडिये बैसवीं कुमारश्रेष्ठ ।
सत्त्व स्वधर्म करीं प्रकट । वडील वृद्धां देखतां ॥
अश्वमेधशतांचें पुण्य । एकीकडे सत्य वचन ।
तुळितां सत्य आगळें जाण । मेरुषर्षप द्दष्टांतें ॥
कोटि पुण्यें जोडिलीं यत्नीं । तीं जळती एके असत्य वचनीं ।
जैसी पावकम्फुलिंगकणी । नाशी कर्पूरगिरीतें ॥
सत्यापरता नाहीं धर्म । सर्वकाळ तिष्ठत ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP