मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
संत जोगा परमानंदाचे अभंग

संत जोगा परमानंदाचे अभंग

संत जोगा परमानंदाचे अभंग

१) वसोनि संताघरीं हो । घेतला गुरगुडी ॥धृ०॥ आधी ब्रह्माण्ड नारळ । मेरू सत्त्व तो अढळ । निर्मळ सत्रावीचे जळ । सोहं गुरगुडी । गुरू गोडी ॥ चिलमी त्रिगुण त्रिविधा । मीपण खडा तो अभेद ॥ तम तमाखु जाळून शुद्ध । वैराग्य विंगळ धरधडी ॥ सावधान लावुनिया नळी । मीपण झुरका विरळा गिळी । जन्ममरणाची मुरकुंडी संभाळी । धूर विषयाचा सोडी ॥ हो घेतली गुरूगोडी । लागला गुरूगोडी । लागला गुरूगोडीचा छंद । त्याला प्रसन्न परमानंद । जोगा स्वामी तो अभंग । गुरूचरण न सोडी ॥ बैसोनी संताघरीं ही घेतली गुरगुडी । हो गुरूगोडी ( महाराष्ट सारस्वत, आ. ५ पृ. १४७ मधून )

२) रोमांच रवरवितु । स्वेद बिंधु ढळमळितु । पाहाता नेम उन्मळतु । मरा मिटो मागुते ॥ ऐसा हृदयीं प्रगटसी । कै माझ्या नरहरी । तुज देखता तनु कांपे । मन बुद्धीही हारपें ॥ सकळही अहंभाव लोपे । एक तत्त्वचि उरे ॥
( महाराष्ट सारस्वत, आ. ५ पृ. १४६ मधून )

३) मन निवाले निवाले । कैसें समाधान झालें ॥ संतं आलिया अवसरी । नवल आरती यांची परी ॥ आनंदे नर नारी । परमानंद प्रकटले ॥ द्यावया आलिंगन । बाह्यां येतसे स्फुरण ॥ सजळ झाले लोचन । जैसे मेघ वर्षती ॥ आजि सुदिन सोहळा । संत जीवनाची कळा ॥ जोगा विनवितो सकळा । भेटी परमानंदेस्त ॥
( महाराष्ट सारस्वत, आ. ५ पृ. १४६ मधून )

संत जोगा परमानंदाचे अभंग समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP