मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
आनंदतनय

आनंदतनय

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


लंकानायक सायकासन गुणीं सज्जावया सज्जला ।
तों सीता भयकंपिता जन महाचिंतांबुधीं मज्जला ॥
झाल्या म्लानमुखी मनोरम सखी तों जों भुजा सांवरी ॥
तों आकार धिकार देखोनि उठे हाकार माडीवरी ।
तो जेव्हां कडकावला धनुवरी ठेला उभा भूतसा ।
सीतेला धडका उठे निजमनीं कीं बोलवेना तसा ॥
ते बोले, पण कासयासि जनकें केला सख्यांनो असा ।
कैसें कारण काय कीं कटकटा आतां प्रयत्नीं असा ॥
वीरासनीं कनककार्मुकबाणपाणी ।
टेंकूनि ढाल, कर घालुनियां कृपाणीं ॥
जो बैसला द्विजगणांत कलानिधी तो ।
म्यां आपणें प्रणियला गुणवारिधी तो ॥
रघुपतिजलधीतें मी नदी जाण वाहें ।
उचित म्हणुनि त्याचें वाक्य ही आण वाहें ॥
जननिजनककानीं गूज हो जाणवा हें ।
न तरि सखि न ठेवीं प्राण मी आण वाहें ॥
पण म्हणुनि पित्यानें घातला कोण पाया ।
कवण वधु वरीते कश्मला कोणपा या ॥
सखि म्हणति ‘धरीते बुद्धि हे तूज सीते ।
पुरविल परमात्मा बुद्धि हेतू जशी ते ॥
हा कोण शैवधनु पारखि येर मेला ।
हा काय योग्य तुजसारिखिये रमेला ॥
कीं हेमवल्लि सुरधामतरूप मानें ।
तूं आणि राम जनसंमत रूपमानें’ ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP