मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
दासोपंत ओंव्या

दासोपंत ओंव्या

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


कल्पांती मेघ रचले । तैसें पाप येकुवटालें ।
येणें आकाश रुंधलें । बाहयांतरीचें ॥९४॥

आतां मग हें गर्जेल । बाणधारा वर्षतील ।
प्रलयो पाप करील । गोत्रवधाचें ॥९५॥
पळें, तेणेंचि जिंकिलें । भिडे, तेणें हारविलें ।
मारी, तेणें मारिलें । आपणपयां ॥९६॥

कल्पांतीचेनि, बा वधणें, । उडालों मी पापें येणें ।
कृष्णा काये करिसी नेणें । तयावरी ॥९७॥

जंव हें आहे घडावें  । तंवचि केशवें चुकवावें ।
घडल्या, जोगें नव्हे । तुम्हा आम्हा ॥९८॥
दहाहि दिशा सुनाटा । परि पळावें कवणा वाटा ? ।
आतां निर्गमाचा दारवंटा । हाचि येकु ॥९९॥
हातीचें शस्त्र सांडणें, । उगेंचि मग पाठीं बैसणें ।
युद्ध कौरवांसी न करणें । हेंचि मुख्या ॥२६००॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP