मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
१ माझे मन नमन मंगलमूर्ति ...

दत्ताजी जाधवाचा पोवाडा - १ माझे मन नमन मंगलमूर्ति ...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.माझे मन नमन मंगलमूर्ति म्या नामिली सारसती ।
इनवी कर जोडुनी भवानी हुर्द द्यावी मती ।
रणामधि रणसुर म्हणविती प्रांत जिंत्या करिती ।
मरणाखर उद्राखर संसराच्या गती ।
झाल्या बादशाही हुकमती वजिर बिजापुरास जाती ।
झगडला दत्ताजी, मर्दा, थोर केली ख्याती ।
ख्याद मी गाईनरे जाधवरायाची करणी ।(चाल)
झगडला न्याहाळिवला त्या निलंगे मैदानीं ।
तमाम उमरावाच्या भाल्याच्या शिंपणीं ।
यशवंतरायानें, मारिली पहिली बिनी ॥


सरलष्कर दल्लेलखान वजिर होते कोण कोण ।
दाऊदखान उल्लेलखान शेख फरासी कुत्तमखान ।
तर लिहिले जोरावर पठाण संगत लोदी मुशाफरखान ।
चालले वजिर यावर बिनी दल्लेलखान ॥


आयका दख्खनचे वजिर राव रंभाजी निंबाळकर ।
भोसल्या बोवाजी संगत जाधवराव वजिर ।
जाधवराव जगजीवन, माणकु बर्‍हाळ ब्राम्हण ।
चालले वजिर यावर बिनी दल्लेलखान ॥
( घोडा ८०००० दिल्लीहून निघाला )


पुणंधरीं झगडा झाला थोर झगडतां मावळला दिनकर ।
झाली आसे रात्र फिरले उमरावाचे भार ।
उमराव आले बहु दुरूनी बिद्दलशाही केली ससनी ।
पाठविले वजिरराव शिरपाव देऊनी ।
भांडतां गड जाला आसे जार, गडकर्‍यांनी केला विचार ।
शिवाजी महाराजाला हो त्यांनी पाठविली खबरा ।
हेजीब गेलासे हुजूर । सांगरे गडाची खबर ।
गड चढतील मोंगुला ।
माणुस जाया होईल फार । यावर शिवाजीच बोलला (चाल)
म्यां मोंगलाशी दावा केला ।
मारिले सुराईत शास्त्रखाना केली हल्ला ।
मागून दसवंसिंग आला ।
गड तो कोंडाणा भांडला ।
शिवाजी बोलला आता भेटूं रजपूताला ( गड स्वाधीन केला )।


आवघा कटबंध करून ।
मोगुल चालला तिथूनी ।
चालति बिन्नीयेनी मोंगला पंढरपूरा गेले ।
घेतले मंगळवेढे, खासे नाही सांपडले (आहो)।
निलंगे मैदानी मोंगली रखत डेरे दिले ॥


सर लष्कर सर्जाखान ।
वजिर होते कोन कोन ।
हिंदुळराव, केदारफणी, घाडगे झुंझारराव चालले ( तर ते )।
पांढरे नाईकजी कुळवंत्राचा मेळा झाला ।
बलुलखान पठाण बहार तो कडाक्याने चालला ( तर तो )।
पंधरा हजार घोडा सर्जाखान जोर आला ॥


सर्जाखानी दवडा दिला ।
हुलरे पडली कुल कटकाला ( आरे )।
मारले कबाडे वाणी बहुत नागविला ।
सर्जाखानी दवडा दिला ।
सातशे वंजारा लुटला ।
कापलासे गोट सर्जाखान निघून गेला ॥


दत्ताजी बाहीरच निघाला सूर्य सुभान प्रकाशला ।
भारामधीं धूर रे रक्षण दत्ताजीला ठीक मग दावितो तेजिला ।
मार तो भरीतो बर्शिला ।
शिकारीचा छंद विशारत देतो लष्कराला ( तर तो ) ।
खेळलासे शिकार जाऊन आमराईंत उतरला ।
पंधरा हजार घोडा सर्जाखान जोर आला ॥


( बडे मछिमे झाट झिंगा )
सर्जाखानी भालदार आला काय बोले दत्ताजीला ।
राव मग झगडता पूरवला निघून जावे या वेळेला ।
यावर शिवाजीच बोलला देश दुनया जाणे मला ।
झगडेन मी सत्येशीं नायकूं न टळे आपल्या बोला ॥

१०
सर्जाखानीं भालदार आला (नि)।
निच्छय झगडयाचा मांडला ।
बाणा - बंदुकांचा रे वर्षाव एक झाला ।
(जाधवराव, त्याचे लेक रघुराव, यशवंतराव, रुस्तुमराव आणि सहाजण शिपाई गठच्या गठ बसला.)

११
यशवंतराय बोले रायाला राव रजा द्यावी मला ।
त्यानें वोढली समशेर जाऊन भारावर लोटला (तर तो)।
मारी कर्डा हात दाणादाण राऊताला ।
(की) पंधरा हजार घोडा, फळी फोडून पल्याड गेला ॥

१२
(सर्जाखानाचा मेव्हणा काशिमखान मुंडया हौद्यांत) ।
(उपटुं बाण बाबा जाऊं दे प्राण यशवंतराव मेला)।
जाधवराव बोले वचनी, यशवंतराव पडले रणीं ।
आणि आज बाजु राखायला निर्वाणीं नाही कुणी ॥

१३
मग रघुरायाची करणी झगडा खेळे झोट धरणीं ।
भांडतो निर्वाणी वाघ मोकळे सोडूनी (तर ते)।
बाणाचे पूर वर बर्शाच्या शिंपणी।
की येका आगळ एकवीस्स जखमा रघूजी लागूनी ।
रघूजीनें झगडा केला हा तर जिवानिशीं वांचला ।
गळा घातली कमान रुस्तुमराव पाडाव केला ॥

१४
जाधवराव रणामधी निघाला (रे)।
ढाल पट्टा पडताळिला ।
एक करतो पायिं स्वार्‍या।
एक राखितो खाशाला ।
हाशाजी सुराजी आवल भांडती बिनीला ।
करून घनचक्कर हात दाविती खाशाला ।
झगडा रणतुंबळ गाजला ।
दावजी कंबळजी लोटला (आहो)।
कडर्या संभाजीने निर्वाण झगडा दिला (आहो)।
मनगट तुटून शिरीची जखन हासाजीला ॥

१५
(जाधवरावांचे तीन मुलगे व सहा शिपाई पडले)।
जाधवराव चालला निर्वाणीं तिथ झाली खणाखणी ।
मुंडामुंड पाडिले एका चढी एक दारुणी ॥

१६
जाधवरा आवखंदा सांपडला घेरा रावतांचा पडला ।
(कीं) एक एक म्हणती जितच धरा दत्ताजीला ।
(तर) पिळा आंगाचा मारिला ।
हात रे त्यानें जोरानें टाकिला ।
झाला असे ठणका हातचा गुर्दा उडून गेला ॥

१७
(काशिमखान समोर आला) (त्याला जाधवाने मारल) जाधवरावाची जोडयाची अणी हत्तीच्या पायांत गेली. सन्मुख लागली जखम, चक्री लागली डोळ्याला, जाधवराव पुरा झाला.

१८
जाधवराव पडला म्हणून ऐकीला ।
सर्जाखान धावून आला ।
कापिलं शिरकंबळ लंगर (कडें सोन्याचें) हातचा काढिला (तर त्या)।
निलंगे मैदानी सर्जाखान यशवंत झाला ॥

१९
(जाधवरावाची बायको बहिणाबाई) (तिचा भाऊ झुंजारराव)।
बंदा शिर मागाया गेला ।
सर्जाखाना सलाम केला (आहो)।
बंद्या द्याहो, शिर, सर्जाखानाशी बोलला ।
सर्जाखाना क्रुध आला ।
बंदा दाणून बोला ।
उमरावका शिर मैं भेजुंगा दरबाराला ॥

२०
घाडग्यांनी बोल केला आपला सोयरेधर्म राखिला ।
शिर घेतलें मागून बंदा वाटेस लाविला ।
(तर ती) शिरा रोंडा भेट केली रचिलें सरण ।
बहिणाईच्या आंगी जैसा चर्चरिला चंदन ।
(तर ती) लेवून बरवी कास दिसे रुद्रयवगीण ।
हत्तीवर बसून दिसे स्वर्गीचें इमान ।
(दल्लेलखान सतीच्या तेथे आला)॥
दिल्लीच्या बादशहाने देणग्या दिल्या त्यांत घनचक्करराव शिपाई होता त्याने हा पोवाडा केला.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP