मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
शाहूमहाराज शिव झाला । अवत...

शाहूमहाराज यांचा मृत्यु - शाहूमहाराज शिव झाला । अवत...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


शाहूमहाराज शिव झाला । अवतार खचला ॥ध्रु०॥
ज्याचें अवघें ऐवढें त्रिभुवन । सुख पावले जन ॥ निर्दाळिले शत्रू दुसमान । मोंगलाई तुरुकान ॥ हाबशी कापती ज्याच्या धाकाला ॥१॥

शुक्रवार दिन चांगला ॥ शाहू मुक्त पावला ॥ नगरी धुंधकार पडला ॥ ऐसा मोहरा । घेउनी चला रे माहुलीला ॥२॥

सखु कदमाची बोलली । धनीन चालली ॥ सती निघते म्हणून बोलली जाऊनी हौद्यांत बैसली ॥ “घेऊन चला रे ह्या शाहूला” ॥३॥

घनीन बोलली लोकांला । “शाहू मुक्त पावला ॥ बेगी बोलावा पेशव्याला चौकण द्या रे चोरटयाला । दुःख देऊ नये रयतेला ॥ कैस करा शिरक्याला । शाहू होता तो निधून गेला” ॥४॥

धनीन सकवार बैसून । कीर्त केली तीन ॥ गेली वैकुंठा भुवन । शाहूसी घेऊन । इंद्रे जयजयकार मांडिला ॥५॥

नाना चालले सरदार । आणि एक उमराव ॥ अग्र दिली हो संगमावर मोठा झाला काहार । दादू चातुर बोलला ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP