मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर| ५ अज्ञात शाहिर चाल - “ लक्षुमि गर्वे निं... बुधीहाळ किला बाका ॥ दुरुन... त्रिंबकराव दाभाडे एका खडी बोला कशि गत झाली ... शाहूमहाराज शिव झाला । अवत... तुझे गुणमी वर्णू किती छत्... भाऊ नाना तलवार धरून । गेल... भाऊसारखा मोहरा । आम्हांवर... भाऊ नानाच दुःख ऐकतां ह्रद... धन्य भगवाना नेलास मोतीदाण... सांग रमाबाई सत्त्वधीर । र... दक्खनचा दिवा मालवला हिरा ... दुक्षिणचा दिवा मालऽऽऽवला ... सवाई माधवराव पेशवे सवाई च... शिपाई थाट रोहिले जाट गांठ... पटवर्धनकुळीं फत्ते तलवार ... जसा रंग श्रीरंग खेळले वृं... द्वापारीं श्रीमाधवविलास भ... १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० कमि नव्हते पृथ्वींत अवंतर... श्रीमंत बाजीराव प्रभुचें ... वाहवाजी मल्हार नाव केलें ... घनी छत्रपती शिवराज नेमले ... सकी आद करवीर तकत थोरजागा... करविर किल्ला बहु रंगेला प... सुभेदार यशवंत कन्हेया सदा... उगा भ्रमसि बा उगा कशाला य... दक्षणच्या पेशव्यांशीं घाल... जास्त आढळले सबब त्या दोघा... पंढरीराया करा दया हालीव स... यशस्वी झाले श्रीमंत पहिले... पुणे शहर किलवाणी दिसती जा... दिन असतां आंधार आकाशतळीं ... गगन कडकडून पडलें, पार नाह... श्रीमंत ईश्वरी अंश धन्य त... जगदीश्वर कोपला गोष्ट झाली... श्रीमंत पेशवे प्रधान बहु ... भले भले सरदार जमून सारे प... श्रीमंतमहाराज सवाई रावसाह... तासगाव अपूर्व परशुरामभाऊच... धोशा धुळपाचा अति आनंदराव ... नमीन मंगलमूर्ती ॥ म्यां न... १ माझे मन नमन मंगलमूर्ति ... आजि इंग्रजाचा गर्व । केला... सेखोजी सहोदरातें आला । या... सर केला टिपू सुलतान फिरंग... शिपाई चाकरी गेले नागपुराल... भले नाना फडणीस केली कीर्त... सोमवाराचे दिवशीं निघाले प... मानवी तनू अवतार धरूनी केल... सोडून सारा राज्यपसारा निघ... श्रीमंत म्हाराज पेशवे धनी... श्रीमंत बाजीराव कन्हया श्... श्रिमंत झाले लोक श्रिमंता... केले दंग समशेरजंग इंगरेजा... करूनि गेली राज ह्याराज सक... सति धन्यधन्य कलियुगीं अहि... पुण्यप्रतापी धन्य जगामधि ... सवाई जानराव धुळप मोहरा वि... धनी सयाजी महाराज धुरंधर भ... दामाजीपंतांनी जगविले ब्रा... नांदगांव प्रगाणा जागा आजं... श्रीमंत पंतप्रधान उभैता भ... तिसर्या रघूजी भोसल्याचा पोवाडा खडर्याची लढाई - ५ पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो. Tags : povadaपोवाडामराठी शाहीर - बाळा लक्षुमण ( चाल - घनः शाम सुंदरा० ) Translation - भाषांतर श्रीमंत महाराज पेशवे अमोलिक सुरती मोती । सवाई माधवराव सवारी निघाली नबाबावरती ॥ध्रुपद॥मिळून फौजा ऐकून घ्याव्या नामी नामी सरदार । रघुजि भोंसले दौलतराव शिंदे तुकोजी होळकर ॥ प्रथम दिवशी सशे सशे आपाजी बळवंतराव मुजमदार । सखाराम पानशे परशुराम भाऊ भले हैत झुंजणार ॥ रास्ते लक्षुमण ऐका बाबा फडके बिनीवर । गणपतराव शिवदिन भेरी आबा होते होते शालुकर ॥ मानकरी मराठे लोक ऐका त्यांचा विस्तार । मालोजी घोरपडे आदी नाइक राजे निंबाळकर ॥ सोनवळे सरकले वाघमारे सयाजी भापकर । गोविंदराव चवाण हैबतराव नांदुरकर ॥ भालवणीचे दाजीसाहेबे चौराज्यामधिं महशूर । श्रीमंतांच्या बावन पागा त्यामधिं बावन सरदार ॥ शिंद्यांचे सरदार जिवबादादा एक वीर भारती । पन्नास हजार फौज फिरंगी तिन कंपू संगें जाती ॥ श्रीमंत महाराज पेशवे० ॥१॥भोसल्याचे विठ्ठलपंडित आणिक खासा पठाण । मर्द शिपाई जाउनि भिडती व्याघ्र जसे पंचानन ॥ पन्नास हजार फौज सातशे कैची उंटावर बाण । शंभर हत्ती स्वारीत झुलतो आणिक भोंसल्याचा मान ॥ गाजविली तलवार रणामधिं भले शिपाई ब्राह्मण । गणपतराव शिवदिन भेरी पंधरा हजार तिघेजण ॥ रावसाहेब फडणीस नाना पन्नास हजार सैन्य ॥ याशिवाय मराठे लोक बरोबर फिरंगी दहा पलटण ॥ हपशियान आरबी परदेशिक कइक जाती सवाई माधवराव पेशवे बसुनि नित्य मुजरा घेती ॥ श्रीमंत महाराज पेशवे० ॥२॥पहिली श्रीमंतांची स्वारी पाहुन चांगला मुहूर्त । निघाली बाहेर तमाशा पहाती मग जणुं लोक ॥ सफेत पोशाक घालून अंगावर गहिना हा जडित । दंडि पाचरत्नांच्या पेटया सोन्याचीं कडिं हातांत ॥ सोन्याचें पडदळें गळ्य़ा मधिं शिपाइबाणा शोभत । सजवुन हत्ती बहु खुश होती राव बसले अंबारींत ॥ बसूनशानी दाजी फडके वरती चौरी उडवीत । चोपदार छडिदार पुकारी ‘नका बोलूं’ ललकारीत ॥ दोहों बाजूंनीं उभे शिपाई रामराम मुजरा घेत । ऐशी फौज चालली दर्यामधिं सागर हालवीत ॥ बारा कोस लांबी रुंदी ज्या फौजेचे तळ पडती । दरमजली दरकुच चालून आले नागलवाडीवरती ॥ श्रीमंत महाराज पेशवे० ॥३॥मंगळवारी नबाबांनीं पुढें धाडिलें सेनेस । कळलें श्रीमंताला बोलून नेले आपल्या सरदारांस ॥ “ कशी करावी मसलत नबाब जाईन म्हणतो पुण्यास ।” परशुराम भाऊ म्हणे किं मारूं, मरूं जरी या समयास ॥ नाना फडणिस सखारामबापू पुसती जिवबादादास । जिवबा बोले गर्जुन मोंगल काय आणिला जिन्नस ॥ उडविन बाविस टोप्या झेंडे नेऊन लाविन आकाशास । केली वस्त्रें पांचजणांशी दिली आज्ञा झुंजावयास ॥ पेंढार्याच्या लष्करावरी जाऊन ताकिद करिती । “ज्याची लुट त्याला मुभा कुणी कुणाची ना घेती ।” श्रीमंत महाराज पेशवे ॥४॥मोंगलाचे उजवे बाजुला जिवबादादाचें लष्कर । भरून तोफा तयार मागें लाऊन दिलें पेंढार ॥ आघाडीला परशुरामभाऊ झेक त्याची तलवार । सीतर पहाड पहा जिवबादादा कंबरक्यांत सोडी बार । धडाधडा तोफेचे बार लागतां पडती स्वार ॥ घ्या घ्या म्हणून घाव घालती रक्ताचे वाहती पूर ॥ पळाया कोठें रीघ दिसेना मध्ये शिरलें पेंढार । भाल्यानें टोंचून पाडिती लुटुन घेतलें लष्कर ॥ मामलसे शेनखान बसुन हौद्यांतून मारीती तीर । भले हाणणार. त्या दोघांवर चालविले वार ॥ त्यावर मग रावरंभानें भली गाजविली तलवार । चारपांचशे लोक पाडले भले शिपाई रणशूर ॥ परशुरामभाऊचे पुतणे बळवंतराव झाले ठार । चार प्रहर झुंज झाली साहा घटका चढली रात्र ॥ तरी तोफेचे गोळे राहीना नबाब झाला मग जार ॥ नबाब कहे रावरंभाकु “क्य हुवा मुजेपर कहर । बचाव जान” “ आब तो मेरी चल जलदी तो खरडेपर ।” वांचवला नबाब बाजी न आले परतुन खडर्यावर ॥ जळती चंद्रजोती । नबाब गेला निघुन देखुन फौजा भोंताल्या पळती ॥ श्रीमंत महाराज पेशवे० ॥५॥मोडल्या पालख्या पडले उंट हत्ती सरदार किती । कोण करीत गणीत त्याची कोण कोणाला ना पुसती ॥ बाराशें तोफेचे गोळे चौदाशे बाण सुटती । तोफांच्या धोधाटयाखालीं गाई बैल घोडे पळती ॥ गांवोगांवचे आले लुटारी तीं धरून घेऊन जाती । पडली गांठ जर पेंढार्यांची धन तेही स्वतां नेती ॥ कैक झाले गबर कैकांच्या तोंडीं पडली माती । लुटला दारू गोळा खजिना हत्यारांस नाहीं गणती ॥ खडर्यावर नबाबाभोवती श्रीमंताची झाली जप्ती । रसदा पाणी बंद केली रुपया शेर दाणे विकती ॥ रुपयाचें तांब्याभर पाणी त्यामध्ये अधीं माती । सिनेवर झाला येकच कहर फौजा तटातट मरती ॥ दहापांच सरदार मिळुन नबाबास अर्जी करीतीं । करा सल्ला नाहीं तर पाण्याविना फौजा मरती ॥ उमजला नबाब वकील पाठविले रावसाहेबाप्रती । गेले वकील रावसाहेबापुढें जाऊन मुजरे करिती ॥ टाकिले कागद साग्र वृत्त लिहून पुढें लिहून ठेविती । जें मागाल तें देऊं साहेब सांपडले तुमचे हातीं ॥ नाना भाऊनें चालवलें तुम्ही चालवा तेच रीती । रावसाहेब नानाफडनवीस मग बसून मुनसुबा लिहिती ॥ पासष्ट लाखांची जहागीर मश्रुलमुलुख दे म्हणती । आले परतुन वकील कागद नबाबास वाचून दाखवती । नबाब म्हणे बरें झालें मश्रुलमुलुख दे हातीं ॥ श्रीमंत महाराज पेशवे० ॥६॥सोडला नबाब रावसाहेबांचा झाला लौकिक । पांसष्ट लाखांची जहागिर दिला धाडून मश्रुलमुलुख ॥ निघाला मोंगला भागानगरचा धरला रोंख । दरकुच दरमजलीनें श्रीमंतांचें चाललें कटक ॥ झाले दाखल पुण्यावर मुजरे करिती पाहुन जन लोक । यशवंत महाराज सवाई माधवराव झाले अधिक ॥ केल्या मेजवान्या सरदारां दिले पोषाख । जरी झोंक कडीं तोडे कंठी चौकडे दिले हत्ती घोडे मुलुख ॥ शालिवाहन शके १७१६ चा शिमगा ऐक । दोन प्रहरीं बुडला खळ ज्यावर गोगुलस ॥ गुरुदत्तात्रय माहुरगडीं शिष्याशीं दिली भाक । चिमणराव रंगनाथ हरीचरणीं ठेवूनियां मस्तक ॥ गांव पाटुंदे बीड प्रगणे वाजाचा तडाखा । दुस्मानावर कमचा उडतां त्यला पडला धाक ॥ राणुगुदाजी गदाजी गडगा वनहार दासीबाणा जरी झोंक । खंडु फकीरा फुलनाथ गोसावी डफ घेऊन हातीं ॥ साहेबखान गातो बाणीवर गावया पळोन जाती ॥ श्रीमंत महाराज पेशवे० ॥७॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP