मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर| १ अज्ञात शाहिर चाल - “ लक्षुमि गर्वे निं... बुधीहाळ किला बाका ॥ दुरुन... त्रिंबकराव दाभाडे एका खडी बोला कशि गत झाली ... शाहूमहाराज शिव झाला । अवत... तुझे गुणमी वर्णू किती छत्... भाऊ नाना तलवार धरून । गेल... भाऊसारखा मोहरा । आम्हांवर... भाऊ नानाच दुःख ऐकतां ह्रद... धन्य भगवाना नेलास मोतीदाण... सांग रमाबाई सत्त्वधीर । र... दक्खनचा दिवा मालवला हिरा ... दुक्षिणचा दिवा मालऽऽऽवला ... सवाई माधवराव पेशवे सवाई च... शिपाई थाट रोहिले जाट गांठ... पटवर्धनकुळीं फत्ते तलवार ... जसा रंग श्रीरंग खेळले वृं... द्वापारीं श्रीमाधवविलास भ... १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० कमि नव्हते पृथ्वींत अवंतर... श्रीमंत बाजीराव प्रभुचें ... वाहवाजी मल्हार नाव केलें ... घनी छत्रपती शिवराज नेमले ... सकी आद करवीर तकत थोरजागा... करविर किल्ला बहु रंगेला प... सुभेदार यशवंत कन्हेया सदा... उगा भ्रमसि बा उगा कशाला य... दक्षणच्या पेशव्यांशीं घाल... जास्त आढळले सबब त्या दोघा... पंढरीराया करा दया हालीव स... यशस्वी झाले श्रीमंत पहिले... पुणे शहर किलवाणी दिसती जा... दिन असतां आंधार आकाशतळीं ... गगन कडकडून पडलें, पार नाह... श्रीमंत ईश्वरी अंश धन्य त... जगदीश्वर कोपला गोष्ट झाली... श्रीमंत पेशवे प्रधान बहु ... भले भले सरदार जमून सारे प... श्रीमंतमहाराज सवाई रावसाह... तासगाव अपूर्व परशुरामभाऊच... धोशा धुळपाचा अति आनंदराव ... नमीन मंगलमूर्ती ॥ म्यां न... १ माझे मन नमन मंगलमूर्ति ... आजि इंग्रजाचा गर्व । केला... सेखोजी सहोदरातें आला । या... सर केला टिपू सुलतान फिरंग... शिपाई चाकरी गेले नागपुराल... भले नाना फडणीस केली कीर्त... सोमवाराचे दिवशीं निघाले प... मानवी तनू अवतार धरूनी केल... सोडून सारा राज्यपसारा निघ... श्रीमंत म्हाराज पेशवे धनी... श्रीमंत बाजीराव कन्हया श्... श्रिमंत झाले लोक श्रिमंता... केले दंग समशेरजंग इंगरेजा... करूनि गेली राज ह्याराज सक... सति धन्यधन्य कलियुगीं अहि... पुण्यप्रतापी धन्य जगामधि ... सवाई जानराव धुळप मोहरा वि... धनी सयाजी महाराज धुरंधर भ... दामाजीपंतांनी जगविले ब्रा... नांदगांव प्रगाणा जागा आजं... श्रीमंत पंतप्रधान उभैता भ... तिसर्या रघूजी भोसल्याचा पोवाडा खडर्याची लढाई - १ पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो. Tags : povadaपोवाडामराठी शाहीर - प्रभाकर Translation - भाषांतर दैन्य दिवस आज सरले । सवाई माधवराव प्रतापि कलियुगांत अवतरले ॥ध्रुपद॥भूभार सर्व हराया । युगायुगी अवतार धरी हरी दानव संहाराया ॥कलियुगीं धर्म ताराया । ब्राह्मणवंशी जन्म घेतला रिपु निर्मूळ कराया ॥सुकितीं मागें उराया । सौख्य दिले सर्वास अहरे सवाई माधवराया ॥॥(चाल)॥ धन्य धन्य नानाचें शहाणपण । बृहस्पति ते बनले आपण । गर्भीं प्रभुचें पाहुनि रोपण तेव्हांच केला दुर्घट हा पण । आरंभिले मग रक्षण शिंपण । सरदारांचे घालुन कुंपण ॥ आपल्या अंगी ठेवून निरूपण । हरिपंतांना करुनि रवाना ॥(चाल)॥ दादासाहेब मागें वळविले । लगट करुनि फौजांनी मिळविले ॥ आपुल्या राज्यापार पळविले । कांही दिवस दुःखांत आळविले ॥ इतर कारणी भले लोळविले । लोहोलंगर पायांत खिळविले ॥ ठेवून गडावर चणे दलविले । बंदिवान तेथेंच खपविले ॥चाल)॥ बंड तोतया सहज मोडिला । एक एक त्याचा मंत्री फोडिला ॥ जमाव ठायिचे ठायी तोडिला । अडचण जागी मुख्य कोंडिला ॥ शहराबाहेर नेऊन झोडिला । जो नानांनी पैसा जोडिला । तोच प्रसंगी हुजूर ओढिला ॥ लागेल तितके द्रव्य पुरविले ॥(चाल)॥ तळेगावावर इंग्रज हरला । इष्टुर साहेब रणीच विरला ॥ उरला इंग्रज घांट उतरला । सरमजाम गलबतांत भरला ॥ रातोरात मुंबईत शिरला । सवेंच गाडर पुढेच सरला ॥ शिकस्त खाऊन तोही फिरला । फिरुन पुण्याकडे कधी पाहीना ॥(चाल)॥ अशी रिपूची मस्ती जिरविली । शुद्ध बुद्ध पहा त्याची हरली ॥ कारभार्यांनी पाठ पुरविली । पुण्यामध्ये अमदानी करविली ॥ पुरंदराहुन स्वारी फिरविली । पर्वतीस मग मुंज ठरविली । गजराची भिक्षावळ मिरविली । कालूकरे वाजंत्री वाजती ॥चाल)॥ लग्नचिटया देशावर लिहिल्या । ब्राह्मणांस पालख्याश्व वहिल्या ॥ पाठविल्या बोलाऊं पहिल्या । पठाण मोंगलसहित सहिल्या ॥ छत्रपति रोहिले रोहिल्या । भोसल्यांच्या मौजा पाहिल्या ॥ आणिक किती नांवनिशा राहिल्या । कवीश्वराची नजर पुरेना ॥(चाल)॥ आरशाचे मंडप सजविले । चित्रें काढून चौक उजविले ॥ थयथयांत जन सर्व रिझविले । गुलाब आणि अत्तरें भिजविले ॥ शिष्ट शिष्ट शेवटीं पुजविले । रुपये होन मोहोरांनीं बुजविले ॥ श्रीमंत कार्यार्थ देह झिजविले ॥ यशस्वी झाली सकल मंडळी ॥(चाल)॥ सत्राशें सातांत बदामी । हल्लयाखाली केली रिकामी । एक एक मोहोरे नामी नामी । फार उडाले रणसंग्रामीं ॥ बाजीपंत अण्णा ते कामीं हरीपंत तात्याचे लगामीं । परशुरामपंत त्या मुक्कामीं ॥ स्वामी सेवक बहुत जपले ॥(चाल)॥ गलीमास कांही नव्हते भेऊन । पराक्रमानें किल्ला घेऊन ॥ अलिबक्षावर निशाण ठेवून । पुण्यास नानासहित येऊन । श्रीमंतांनी वाडयामध्यें नेऊन । पंचामृती आनंदे जेऊन ॥ बहुमानांची वस्त्रें देऊन । बोळविलें तयाला ॥(चाल)॥ सत्राशें तेरावें वरीस ॥ अवघड गेलें पहिल्या परीस ॥ करनाटकच्या पहा स्वारीस । टोपीकर मोंगल पडले भरीस ॥ तरी तो टिपू येइना हारीस । त्यावर तात्या गेले परीस ॥ आणुन टिपू खूब जेरीस । साधुनी मतलब हरिपंतांनी ॥(चाल पहिली)॥ नंतर मागें फिरले । दरकुच येऊन पुण्यास प्रभुचे चरण मस्तकीं धरिले ॥ दैन्य दिवस आज सरले०॥१॥केवढें भाग्य रायाचें । चहुंकडे सेवक यशस्वी होती हें पुण्य त्या पायांचें ॥ करितां स्मरण जयाचें । कांहीं तरी व्हावा लाभ असें बलवत्तर नाम जयाचें ॥ प्रधानपद मूळ याचें । सत्राशें चवदांत मिळालें वजीरपद बाच्छायाचें ॥(चाल)॥ मुगुटमणी ते पाटिलबावा । कोठवर त्यांचा प्रताप गावा ॥ दर्शनमात्रे तापच जावा । नवस नवसितां फळास यावा ॥ हरहमेशा शत्रुशि दावा । माहित सगळा मराठी कावा ॥ हुशार फौजा लढाई लावा । जिंकुन हिंदुस्थान परतले ॥(चाल)॥ चवडा वर्षे बहुत भागले । म्हणून शिरस्ते पाहून मागले ॥ तरतुदीस कारभारी लागले । उंच उंच पोषाग चांगले ॥ देऊन फार मर्जीनें वागले । भेटीसमयीं जंबूर डागले ॥ मग तोफांचे बार शिलगले । सूर्यबिंब अगदींच झांकले ॥(चाल)॥ राव जेव्हां नालकींत बसले । कृष्ण तेव्हां ते जनास दिसले । अर्जुन पाटिलबावा भोसले । पायपोस पदरानें पुसले ॥ चरणीं मिठी माराया घुसले । कर प्रभुनीं बगलेंत खुपसले ॥ इमानी चाकर नाहींतअसले । धन्य धनी आणि अनिवार पतंग । पळस फुलाचा नाहीं प्रसंग ॥ मस्त चालती ॥(चाल)॥ गुलास सोदे बुडवुनि पाजी । पंतप्रधान राखुन राजी ॥ लष्कर दुनय, करून ताजी । शके विष्णुपरदाजी । शरीर वानवडीस ठेवुनी ॥(चाल)॥ सवाचार महिन्यांचें अन्तर । हरिपंत तात्या गेले नंतर ॥ तेथें न चाले तंतर मंतर । वर्तमान हें एक अधिकोत्तर ॥ कांहीं न करिती नाना उत्तर । दिलगीर मजीं सुकलें अंतर ॥ हिरे हरपले राहिले फ्त्तर । तरी तो पुरुष बहुत धिराचा ॥(चाल)॥ दौलतीचे आज खांबच खचले । लाल होते ते कोठेंच पचले ॥ शिपायांचे काय चुडेच पिचले । परंतु नाना नाहीं कचले ॥ कडोविकडीचे विचार सुचले । कलमज्यारीचे घटाव मचले ॥ मोगंलावार मोचें रचले । जिकडे तिकडे झाली तयारी ॥(चाला)॥ पुकार पडला पृथ्वीवरती सैन्यसमुद्रा आली भरती ॥ आगाऊ खर्ची मोहरा सुतीं । रात्रंदिवस श्रम नाना करती ॥ कशी ही मोहिम होईल पुरती । राव निघाले सुदिनमुहूर्तीं ॥ लिंबलोण उतरितात गरती । इडापिडा काढून टाकिती ॥(चाल)॥ गारपिराच्या मग रोखांना । तमाम रिघला फरासखाना ॥ उजव्या बाजूस जामदारखाना । डावेकडे तो जवेरखाना । देवढीबराबर सराफखाना । चकचकीत खुभ सिलेखाना । मध्यें रायाचा तालिमखाना खाळ खळ खळ जेजिमा वाजती ॥(चाल)॥ वाडयाबाहेर जिन्नसखाना । बाजाराच्या पुढें पिलखाणा ॥ दिला बिनीवर तोफखाना । मोठमोठया पल्ल्याच्या जरवा ॥(चाल पहिली)॥ चोहोंकडे लोक पसरले । नित्य नवे गणतीस लागती एकांडे देशावरले ॥ दैन्य दिवस आज सरले०॥२॥ बहुत शिंदे जमले । शिलेपोस पलटणें लाविती पठाण जरिचे समले ॥ रणपंडित ते गमले । भले भले पंजाबी ज्वान दक्षिणेंत येउन रमले । ज्यांपुढें शत्रु दमले । त्यांणीं शतावधि कोस स्वामिकार्यास्तव लवकर क्रमिले ॥(चाल)॥ आधींच दौलतराव निघाले । काय दैवाचे शिकंदर ताले ॥ फौज सभोंवतीं जमून चाले । खांद्यावरती घेऊन भाले ॥ सर्व लढाया तयार झाले । जिवबादादा गर्जत आले ॥ हासनभाई उज्जनीवाले । महाराजांचे केवळ कलिज ॥(चाल)॥ बाळोबास तर काळिज नाहीं । धीट रणामध्यें उभाच राही ॥ धोंडिबास जगदंबा साही । जय करण्याची चिंता वाही । सदाशिव मल्हार कांहीं ॥ मागें पुढें तिळमात्र न पाही । देवजी गवळी रिपूस बाही ॥ रणांगणाचा समय साधिती ॥(चाल)॥ निसंग नारायणराव बक्षी । हटकुन मारी उडता पक्षी ॥ बंदुकीला कटपटयास नक्षी । फत्ते होई तों गोड न भक्षी ॥ रायाची पाटिला महत्त्व रक्षी । नित्य कल्लयाण धन्यांचे लक्षी । पिढीजाद शिंद्याचे पक्षीं । केवळ अंतरंग जिवांचे ॥(चाल)॥ मेरूसाहेब कठिण फिरंगी । कलाकुशलता ज्याचे अंगी ॥ सामायन किळकाटा जंगी । मुकीरसाहेब भले बहुरंगी ॥ हपिसर पदरीं चंगीभंगी । जीनसाहेबाची समशेर नंगी । दुर्जन साहेब झटे प्रसंगी । झर झर झर बुरुज बांधुनी ॥(चाल)॥ शाहामतखा सरदार किराणी । बाच्छायजादे थेट इराणी ॥ किती काबूल खदार दुराणी । मुजफरखाची टोळी खोराणी ॥ कडकडीत सिंगरूपची राणी । तारीफ करती गोष्ट पुराणी ॥ इतरांची ठेविना शिराणी । पंचविशीमध्यें ज्वान पलटणी ॥(चाल)॥ येथून सरली शिंदेशाई । होळकराची आली अवाई ॥ तुकोजी बाबांना गुरमाई । आधींच बळ स्वार शिपाई । वारगळ बरोबर फणशे जावाई ॥ लांबहांते बुळे वाघ सवाई । वाघमारे कुळ धनगरभाई ॥ खेरीज ब्राह्मण नागो जिवाजी ॥(चाल)॥शिवाय होळकर खासे खासे । काशीबाजी तर हुंगुन फांसे । लढाईचे आणून नकाशे । स्वस्थपणें करतात तमाशे ॥ बापुसाहेबांना येती उमासे । मल्हारजींनी देउन दिलासे ॥ जा जा म्हणती लोक बगासे । जंहामर्द तरवारकरांचे ॥(चाल)॥ हरजी विठूजी आनंदराव । स्वतां धनी यशवंतराव ॥ संताजीचें प्रसिद्ध नांव । आबाजीचा तिखट स्वभाव । दूर नेला साधितात डाव ॥ विचारी मतकर माधवराव । भागवतांनी सोडुन गांव ॥ ताबडतोब निघाले ॥(चाल)॥ महाशूर पटवर्धन सारे । ठाइं ठाइं त्यांचे फार पसारे ॥ चिंतामणराव शूर कसारे । केवळ एकांगी वीर जसारे ॥ परशुराम रामचंद्र असारे । चहुंकडे ज्याचा पूर्ण ठसारे ॥ अप्पासाहेब तोही तसारे । थरथर ज्याला शूर कांपती ॥(चाल)॥ रास्ते आनंदराव दादा । पानशांची बहु मर्यादा ॥ विंचुरकरामधिं गांडु एखादा । राजाबहाद्दर पुरुय जवादा । चौपट खर्च दुप्पट आदा ॥ पुरंधर्यांची कदीम इरादा । तत्पर पेठे मोगलवादा ॥ ओढेकरही येऊन भेटले ॥(चाल पहिली)॥ वामोरकर सांवरले आंबेकर आणि बारामतीकर प्रसंगास अनुसरले ॥ दैन्य दिवस आज सरले ॥३॥खास पतक नानाचें । निवडक माणुस त्यांत पुरातन सूचक संधानाचें ॥ पद देऊनि मानाचें । खुप करुनि बाबास काम मग सांगुन सुलतानाचें ॥ बळ विशेष यवनांचें । हें ऐकुनी लोकांनीं सोडिलें पाणी शीरसदनाचें ॥(चाल)॥ आपा बळवंतराव सुबुद्ध बिनिवाले पुरुषार्थी प्रबुद्ध ॥ पवारांत मर्दाने शुद्धा । वाढविति भापकर विरुद्ध ॥ केवढयांना शुष्कवत युद्ध । काढिती हांडे रणीं अशुद्ध ॥ धायगुडे निर्बाणी कुबुद्ध । शेखमिरा फौजेंत मिसळले ॥(चाल)॥ पराक्रमी हिमतीचे दरेकर । तसेच जाधव बुरुजवाडीकर ॥ अमीरसिंग जाधव माळेगावंकर । सुजाण गोपाळराव तळेगांवकर ॥ जानराव नाईक नठ निंबाळकर । शेकर सोयरे बाळो वडाळकर ॥ करारी डफळे अनंतपुरकर । आढोळ्याचे लोक इमानी ॥(चाल)॥ कामरगांवकर मग बोलवले । प्रतिनिधीला किती गौरविले । हर्ष वाहले पुढें सरसावले ॥ रणनवरे दरकुच धांवले । समाधान राऊत पावले । बन्या बापु जसे नवरे मिरविले । शहर पुणें रक्षणार्थ ठेविले ॥ माधवराव रामचंद्र कानडे ॥(चाल)॥ सरमजामी सरदार संपले । शिलेदार मागें नाहीं लपले ॥ धाराशिवकर लेले खपले । जमेत सुद्धां ते आपापले ॥ गोट गणतिला तमाम जपले । सानपदोर्गे निगडे टपले ॥ खुळे वाघ आणि बाबर सुपले । भगत बडे डोबाले दिपले ॥ जाधव काळे माळशिकारे ॥(चाल)॥ बाजीराव गोविंद बर्वे । लाड शिरोळे धायबर सुर्वे ॥ दाभाडयाचा हात न धरवे । भगवंतसिंग बैसे बेपर्वे । वझरकराचा लौकिक मिरवे । खंडाळ्याचे पोषाग हिरवे ॥ नलगे भोयेत सुंदर सर्व । सखाराम हरी बाबुराव ते ॥(चाल)॥ कडकडीत हुजुरात हुजुरची । वीस सहस्त्र जूट पदरची ॥ राउत घोडा बंदुक बरची । केवळ आगच उतरे बरची ॥ एक एक पागा अमोल घरची । दाद न देती देशांतरची ॥ काय कथा त्या भागानगरची । रणांगणी काळास जिंकिती ॥(चाल)॥ दिघे फडतरे बाबरकाठे । तळापीर मानसिंग खलाटे । मारिती पुढें समोर सपाटे । निलाम कवडे झाले खपाटे ॥ देवकांत्याचे फार हाकाटे । मुळे गांवढे करिती गल्हाटे ॥ जगतापाचे महतर भोयटे । भले मुर्तुजा महात थडयाचे ॥(चाल)॥ गणेश गंगाधर थोरात । निळकंठ रामचंद्र भरात ॥ आयतुळे मान्य सकळ शूरांत । बेहरे मांजरे योग्य वीरांत ॥ राघी बापुजी रणघोरांत । येसोजी हरी सैन्य पुरांत ॥ दारकोजीबाबा निंबाळकरांत । वरिश्रींत तो धुंद सग्याबा ॥(चाल)॥ कृष्णसिंग हैबतसिंग तारे । तसेच लक्ष्मणसिंग बारे ॥ दावलबावा महात सारे । मिळाले भापकर ते परभारे ॥ मैराळजी पायगुडे विचारे । इंदापुरकर नव्हत बिचारे । गणेश विठ्ठल वाघमारे ॥ बिडकर खुर्देकर आटीचे ॥(चाल)॥ राठोड श्रमाचे ॥ टिळे कपाळी रामनामाचे । बिनीबरोबर ते नेमाचे ॥ श्रीमंतस्मरणें काळ क्रमाचे । जसे दूत सांबाचे प्रतापी ॥(चाल पहिली)॥ प्रपंच वैद्य विसरले । चिलख बखूतर शिलेटोप मल्हारराव पांघरले ॥ दैन्य दिवस आज ते सरले० ॥४॥लष्कर सगळें गुर्के । जरीपटक्याभोंताले घालिती गरर मानकरी गर्के ॥ सुंदर गोरे भुके । घोरपडे पाटणकर महाडिक खानवीलकर शिर्के ॥ मुंगी मध्ये ना फिर्के । चव्हाण मोहिते गुजर घाडगे निंबाळकर दे चर्के ॥(चाल)॥ पुढे पसरले रिसालदार । भुसा मुत्रीम नामदार ॥ सय्यद अहमद जमादार । अमीर आबास नव्हे नादार ॥ शाहामिरखां ते डौलदार । इतक्यांवर ते हुकूमदार ॥ राघोपंत ते दौलतदार । तसे काशिबा बल्लाळ रानडे ॥(चाल)॥ गोरा मुसावास अमोल । मुसानारद तो समतोल ॥ विनायकपंताचा बांधुनि आबा काळे गुणीच डोल ॥ टोपकराचे बोलती बोल । पायदळांचा बांधुनि गोल ॥ तंबुर ताशे वाजती ढोल । उठावल्या बैरखा निशाणें ॥(चाल)॥ संस्थानी याविरहित राजे । सेनासाहेब किताब साजे ॥ राघोजीबाबा नांव विराजे । बाणांचा भडीमार माजे ॥ सरखेलांचा लौकिक गाजे । समशेर बहादर गरीब नवाजे ॥ अकलकोटी लोक ताजे । दुर्जनसिंग रजपूत हडोदी ॥(चाल)॥ दक्षण उत्तर पश्चिम भागीं । पसरून तोफा जागोजागी । तमाम गारदी त्याचे मागी । स्वार सैन्य त्यामागें झगागी ॥ जरीपटका तो दुरून धगागी । कोणीच नव्हता त्यांत अभागी ॥ त्वरित बक्षिस पावे बिदागी । जासून सांडणीस्वार धांवती ॥(चाल)॥ काय पलटणच्या फैरा झडती । पर्जन्यापरि गोळ्या पडती ॥ शिरकमळें कुंदुकवत् उडती । छिन्न भिन्न किती होऊन रडती ॥ कितीक पाण्याविण तडफडती । कितीक प्रेतामधीच दडती ॥ वीर विरांशी निसंग भिडती । सतीसारखे विडे उचलिती ॥(चाल)॥ पाउल पाउल पुढें सरकती । घाव चुकावून शूर थडकती -॥ सुपुत, वाघापरी गुरकती । हत्यार लाऊन मागें मुरकती ॥ खुणेनें शत्रुवर्म तरकती । मोंगल बच्चे मागें सरकती ॥ जिवबादादा मनीं चरकती । अररररर शाबास बापांनो ॥(चाल)॥ सुटती तोफा धुंद दणादण गुंगत गोळे येती छणाछण ॥ सों सों करिती बाण सणासण । खालेल घोडे उडती झणाझण । एकच गदीं झाली धुराची ॥(चाल)॥ थोर मांडली रणधुमाळी । अगदींच बसली मग कांठाळी ॥ फौज पसरली रानोमाळीं । लाखो लाख तरवार झळाली ॥ होळकराची फिरती पाळी । जिवबांची मर्दुमकी निराळी ॥ मोंगलाची केली टवाळी । सबळ पुण्य श्रीमंत प्रभूचें ॥(चाल)॥ अठरा घटका लाही फुटली । तोफ ह्जारों हजार सुटली ॥ मिरजकरांची मंडळी झटली । भाउबरोबर निसंग तुटली ॥ मोंगल सेना मागें हटली ॥ त्यासमयीं कैकांची उपटली ॥ पेंढार्यांनीं दौलत लुटली । गबर झाले एका दिसांत ॥(चाल)॥ शके सत्राशें सोळा भरतां । आनंद संवत्सरही सरतां । दहा दिवस शिमग्याचे उरतां । वद्य पंचमी सुवेळ ठरतां ॥ तीन प्रहरांचा अंमल फिरतां । मोगलांशी प्रसंग करितां ॥ पळाले मोंगल धीर न धरतां । चंद्रउदयी खडर्यात कोंडिले ॥(चाल पहिली)॥ गढींत खासे शिरले । मराठे मोंगल पठाण पुर्भे इतर घरोघर भरले ॥ दैन्य दिवस हे आज सरले ॥५॥बहुत खराबी जहाली । मोहोर्यावरची फौज सैनिकांसहित रस्ते नाहली ॥ त्यांत उन्हाची काहाली । रुपयांचे दिड शेर पाणी अशी कठीण वेळा वाहली ॥ ती सर्व जनांनीं पाहिली । जिवबादादा परशुरामपंतांची दिसंदिस बहाली ॥(चाल)॥ निजाम अल्लीखान नव्हे सामान्य । बाच्छाई सुलतानांत मान्य ॥ जुनाट पुरुषांत राजमान्य । अपार पदरीं मण धनधान्य ॥ कोण बरोबरी करील अन्य । दैव धन्याचें मुळीं प्राधान्य ॥ तशांत झाले अनुकूल दैन्य । नाहीं तर घेते खबर पुण्याची ॥(चाल)॥ जेव्हां मारिती यवन मुसंडी । तेव्हांच होई ती फौज दुखंडी ॥ साठ सहस्त्र पठाण बुंडी । तिनशें तोफा थोर अखंडी ॥ पंचरशी आणि बिडी लोखंडी । तयार दारु तिनशे खंडी ॥ असें असुनियां दबली लंडी । धरून मश्रुल्मुलूख आणिला ॥(चाल)॥ संकटीं मोंगल अति पडियेला । देश होता तो तोडीस नेला ॥ तो तेहतीस लक्षांचा गेला । तीन कोटींचा करार केला ॥ पण नानांशी सिद्धीस नेला । फिरली मोंगलाचा ढपेला ॥ नक्षत्रापरी आला तजेला । त्यामध्यें माधव चंद्र उदेला ॥(चाल)॥ स्वारी नव्हे स्वयंवर झालें । श्रीमंतांस ऐश्वर्य मिळालें ॥ अपेश अटकेपार पळालें । यादव सैन्य हरीभोंतालें ॥ तसेंच लष्कर पुण्यास आलें । पहावया जन सर्व निघाले ॥ दर्शन होतां शरीर निवालें । घरोघरीं आनंद माइना ॥(चाल)॥ पाहुन पूर्वापार शिरस्ते । भवानी पेठेपासुनी रस्ते ॥ दीपोत्सव शोभती दुरस्ते । शृंगारून गज तुरंग बस्ते ॥ शहरामाजी पदार्थ सस्ते । पहिलवान आणि जेठी मस्ते । खुराक त्यांना बदाम पिस्ते ॥ सदा धुंद जिलीबींत चालती ॥(चाल)॥ भांड भाट भालदार भवय्ये । सुस्वर गाती धाडी गवय्ये ॥ शिरापुरीचे सदा खवय्ये । मिठाई देती नित्य हलवय्ये ॥ लोक सभोंवती लढवय्ये । नानासारिखे वीर संगवय्ये ॥ बलाढय शत्रू पराभवय्ये । धनी रावराजेंद्र कन्हय्ये ॥(चाल)॥ लगी बाण बोथाटया दाट । बिनाइटयाचा खळखळाट ॥ अंबार्यांचा मागें थाट । त्यामागें हुजुरात अचाट ॥ सत्तर हत्ती पुढें जुनाट । मधून फुटेना मुंगीस वाट ॥ झुगारिल्या जरी दुरूनी ताट । तरी तें खालीं कधीं पडेना ॥(चाल)॥ सत्राशें सत्रामधि स्वारी । राक्षस संवत्सरी स्वनगरीं ॥ उलटुनि आली घरिं माघारीं । संवत् वैशाखाची बहारी ॥ शुद्ध त्रयोदशी शुक्रवारीं । दहा घटका रात्रिच्या सुमारीं । गुढया उभारून राजद्वारीं । गृहप्रवेश केला प्रभुनीं ॥(चाल)॥ न्याहाल केलें सरदारांना । दिला चौघडा मिरजकरांना ॥ खेरीज जहागिर विंचुरकरांना । कडीं कंठया देऊन शूरांना ॥ गौरवुनीं वीरांना । निरोप दिले मग अमीरांना ॥ गेले कृष्णा भीमातिरांना । कुटुंबसुद्धां स्वस्थ नांदती ॥(चाल)॥ गंगु हैबती शाईर मोठे । कवनीं ज्यांच्या बंद बनोटे ॥ महादेवाचे सवाई सोटे । गुणी राजाचे शब्द शिधोटे । जसे गोडिला घिवर चिरोटे ॥ सतर कवीश्वर केवळ गोटे । अर्थप्रास लावितात खोटे ॥ पगडया फिरवुन डौल मिरविती ॥(चाल पहिली)॥ कैक प्रसंगीं हरले । बिनडाकिल दागिने अमोलिक प्रभाकराचे ठरले ॥ दैन्य दिवस आज सरले ॥६॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP