मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
वाहवाजी मल्हार नाव केलें ...

मल्हारराव होळकर - वाहवाजी मल्हार नाव केलें ...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


वाहवाजी मल्हार नाव केलें खूप राहिलें दुनियेंत । लक्ष जीवांचा पालनवाला चंद्र हरपला गगनांत ॥ध्रु०॥
कुंजपुरावर करून लढाई मोठें यश या तलवारी । गंगथडीहुन आली पुण्याला कर्डि फौज बांकी स्वारी ॥(चाल)॥ संगे बाकीन बाकी फौज नाही ॥ तूर्त भोगिलें राज्य ॥ दर्योत बुडालें जहाज । पुढे होणार जाणार कळेना लिहिले याच्या दैवांत ॥ आयुष्याची दोरी तुटली कसे कोपले भगवंत ॥ बाहवाजी मल्हार० ॥१॥

लाख्या बारगीर हिंडुन आला दरबारीं घेऊन सारी सेना ॥ लाख रुपये कुठून द्यावे हिव्या कोणाचा होईना ॥ लाख्या बारगीर म्हणे मल्हारबा आलो मी तुमच्या दर्शना । मल्हारजी होळकर बोलू लागला नाहीं लाखाचा परगणा ॥(चाल)॥ ज्यानें थोर हिय्या केला । लाख्या बारगीर ठेविला ॥ एक घोडा बसाया दिला । पन्नास माणूस दिमतिला ॥ दहा माणूस सेवेला । किती जेवी त्याच्या पंक्तीला ॥ पाचशे रुपये निवळ मोजून घातले त्याच्या पदरांत । असे रुपये कितीक झाले करा वर्षाचे गणीत ॥ वाहवाजी मल्हार० ॥२॥

मल्हारजी होळकर नेटके करित बसले देवपूजा ॥ एकाएकीं झाली गर्दी आग लागली दारूच्या गंजा ॥ लाख्या बारगिर धांवून आला म्हणे मल्हारबा मनीं समजा । काय बसला निश्चिंत घडीभर ठेवा गुंडाळून देवपुजा ॥(चाल)॥ राव मल्हार उठले आंगं । हातिं घेऊन ढाल फीरंग । हिमत कर मामा अंगे ॥ तो लाख्या बारगिर संगें । तुम्ही म्होरे या मी मागें ॥ मल्हाररावाची दासी बोलली दिनभर बसा डेर्‍यांत । तिला दिले लवंडून मल्हारबा गेले रागांत ॥ वाहवाजी मल्हार० ॥३॥

लाख्या बारगिर, मल्हारजी होळकर रणामधिं बघा नवरा । तिसरा खिजमतदार संगती इमानाचा होता पुरा ॥ दारूच्या अमलांत झमाझम उडू लागल्या तलवारा । माणूस पडले फार शाईमध्ये पाहू लागले भिरभिरा ॥(चाल)॥ शाईमध्ये माइचा पुत । जोडगोळ्या भरून बारचेत ॥ पाहुनि मारी छातींत । राव मल्हार केला चित । मागुन मारिला लाख्या बारगिर प्रेतावर पडलें प्रेत । तिसरा खिजमतगार, राख मग चौघांची एकच मौत ॥ वाहवाजी मल्हार० ॥४॥

मोठे मोठे सरदार करिती विचार मनामधिं चकचुर होती । काय बलावणें झालें मल्हारबा सवती आपली बाजू होती ॥ काहीच घेणे काहींच देणें नाही आपुलिया हातीं । जे झाले ते बरें झाले द्या रायाला मुठमाती ॥(चाल)॥ तुम्ही होळकर बोलवा । तुम्ही करा मातेची सेवा ॥ थडग्याला काम तुम्ही लावा । होळकर शाईमधें मल्हारबा होता एकच पूत । खूप केलीस तलवार सवाई मल्हारी नांव साजत ॥ वाहवाजी मल्हार० ॥५॥

लाख्या बारगिर मल्हारराव रणबहिरी कां मारल ॥(चाल)॥ लाख्या बारगिर ज्यानें ठेविला । खुप छापी हिय्या केला ॥ शहाअल्लीबोबा गुरु बोलला । शुर मर्दाचा पोवाडा । थोडया दिवसांमधिं पंची वाजवून गेला चौघडा ॥(चाल)॥ पुढे होणार जाणार । ते ब्रह्माचे अक्षर ॥ हे कदा नाहीं चुकणार । बोले राणू सुतार ॥ रहिवाशी पुणें शहर । राजुताजुशा फकीर ॥ ठिकाणा राहतो उंदिर गावांत, त्याची दस्ती नाही कोणाला ॥ कजब्याला ॥ कजब्याला जोडून हात ॥ वाहवाजी मल्हार० ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP