मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर| कमि नव्हते पृथ्वींत अवंतर... अज्ञात शाहिर चाल - “ लक्षुमि गर्वे निं... बुधीहाळ किला बाका ॥ दुरुन... त्रिंबकराव दाभाडे एका खडी बोला कशि गत झाली ... शाहूमहाराज शिव झाला । अवत... तुझे गुणमी वर्णू किती छत्... भाऊ नाना तलवार धरून । गेल... भाऊसारखा मोहरा । आम्हांवर... भाऊ नानाच दुःख ऐकतां ह्रद... धन्य भगवाना नेलास मोतीदाण... सांग रमाबाई सत्त्वधीर । र... दक्खनचा दिवा मालवला हिरा ... दुक्षिणचा दिवा मालऽऽऽवला ... सवाई माधवराव पेशवे सवाई च... शिपाई थाट रोहिले जाट गांठ... पटवर्धनकुळीं फत्ते तलवार ... जसा रंग श्रीरंग खेळले वृं... द्वापारीं श्रीमाधवविलास भ... १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० कमि नव्हते पृथ्वींत अवंतर... श्रीमंत बाजीराव प्रभुचें ... वाहवाजी मल्हार नाव केलें ... घनी छत्रपती शिवराज नेमले ... सकी आद करवीर तकत थोरजागा... करविर किल्ला बहु रंगेला प... सुभेदार यशवंत कन्हेया सदा... उगा भ्रमसि बा उगा कशाला य... दक्षणच्या पेशव्यांशीं घाल... जास्त आढळले सबब त्या दोघा... पंढरीराया करा दया हालीव स... यशस्वी झाले श्रीमंत पहिले... पुणे शहर किलवाणी दिसती जा... दिन असतां आंधार आकाशतळीं ... गगन कडकडून पडलें, पार नाह... श्रीमंत ईश्वरी अंश धन्य त... जगदीश्वर कोपला गोष्ट झाली... श्रीमंत पेशवे प्रधान बहु ... भले भले सरदार जमून सारे प... श्रीमंतमहाराज सवाई रावसाह... तासगाव अपूर्व परशुरामभाऊच... धोशा धुळपाचा अति आनंदराव ... नमीन मंगलमूर्ती ॥ म्यां न... १ माझे मन नमन मंगलमूर्ति ... आजि इंग्रजाचा गर्व । केला... सेखोजी सहोदरातें आला । या... सर केला टिपू सुलतान फिरंग... शिपाई चाकरी गेले नागपुराल... भले नाना फडणीस केली कीर्त... सोमवाराचे दिवशीं निघाले प... मानवी तनू अवतार धरूनी केल... सोडून सारा राज्यपसारा निघ... श्रीमंत म्हाराज पेशवे धनी... श्रीमंत बाजीराव कन्हया श्... श्रिमंत झाले लोक श्रिमंता... केले दंग समशेरजंग इंगरेजा... करूनि गेली राज ह्याराज सक... सति धन्यधन्य कलियुगीं अहि... पुण्यप्रतापी धन्य जगामधि ... सवाई जानराव धुळप मोहरा वि... धनी सयाजी महाराज धुरंधर भ... दामाजीपंतांनी जगविले ब्रा... नांदगांव प्रगाणा जागा आजं... श्रीमंत पंतप्रधान उभैता भ... तिसर्या रघूजी भोसल्याचा पोवाडा सवाई माधवरावाचा मृत्य़ू - कमि नव्हते पृथ्वींत अवंतर... पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो. Tags : povadaपोवाडामराठी शाहीर - प्रभाकर Translation - भाषांतर कमि नव्हते पृथ्वींत अवंतर प्राणी न्यायाला । औक्ष कसें कमि झालें सवाई माधवरायाला ॥ध्रपुद॥प्रभू नारायणराव धुरंधर दक्षिणचे नृपती । प्रसन्न वदनें करुनि जयाला सकळ प्रजा जपती ॥ पतिव्रता किती धनाढय गंगाबाई भोंवत्या खपती । सुशील सति सौभाग्यवतीपुढें रूपवत्या लपती ॥ सवाई माधवराव प्रसवली कुळदीपक दिपती । पुरंदरीं रक्षणार्थ मंत्री रात्रंदिवस जपती ॥चाल)॥ शके सोळाशें शहाण्णवाच्या मूळ जय संवत्सरीं । अधिक होता वैशाख शुद्ध सप्तमी चंद्र वासरीं । पुनर्वसू नक्षत्र कडकडित दुपारचे अवसरीं ॥(चाल)॥ झाल जन्म हा दैदीप्यमान पूतळा । जणु सूर्य़ उगवता प्रकाश करी भूतळा ॥ दिलें द्र्व्य कंचुक्या नाही गणती पातळा ॥(चाल पहिली)॥ महोत्साह घोराघरीं लागले लोक करायाला । परशुराम प्रत्यक्ष आले काय छत्र धरायाला ॥ कमि नव्हते०॥ ॥१॥पुरंदराहुन पुण्यास आणिले राव पंचम वर्षी । गुढया तोरणें उभवुन केली मुंज प्रथम सरशी ॥ विवाह कार्या भूप मिळविले अति हर्षा हर्षीं । देतिं धाडून करभार ढिगाचे ढिग कोरे फरशी ॥ स्वार्या करून सरदार बुडविती रिपु चुरसाचुरशी । थरथर किति कांपती वयस्कर उभे टाकुन खुरशी ॥(चाल)॥ प्रताप महिमा थोरे जळामधिं परि जळचर अडविला । नवी मोहिम दरसाल देउनी शाह टिपू तुडविला । अपार सेना लढवुनि मोंगल खडर्यावर बडविला ॥(चाल)॥ एकेक पदरचा सेवक साहेब सुभा । समरांगणीं सन्मुख कोणि न राहे उभा । ज्या दिशेस ज्याचा रोंख ती त्याला मुभा ॥(चाल पहिली)॥ विजेपासूनि करि प्रभा चंद्र तारांगण ठायाला । प्रौढ होतां संपूर्ण लोक आले खरेच उदयाला ॥ कमि नव्हते०॥ ॥२॥काही दिवस भयरहित सदोदित स्वराज्य चालविलें । दरिद्र अटकेपार जनांचे ज्यानें घालविलें । तीर्थरूपांहुन सकळ भूमंडळ बसून हालविलें । रीतभात इनसाफ लवण नाहीं दुधांत । कालविलें ॥ क्षीरसागरीं कृष्णास मुदत भरतांक्षणि बोलविलें । रीतभात इनसाफ लवण नाहीं दुधांत कालविलें ॥ क्षीरसागरीं कृष्णास मुद्त भरतांक्षणि बोलविलें । तसें रावसाहेबांस अकल्पित वरून पालविलें ॥(चाल)॥ उदास झालें चित्त परोपरि त्या दिवसापासुनी । विचुक बोलती शब्द घडोघडिं ह्रदयांतरी त्रासुनी । बाजीराव साहेबांस आणा जा गुज सांगा निरसुनी ॥(चाल)॥ शिक्के दऊत पट कटार दुसरी करा । आडवलें मनांतुनी विधि विष्णू शंकरा । ठेवुं नका निराळें दादांच्या लेंकरा ॥(चाल पहिली)॥ तुम्ही सेवक ते धनी होऊनि एक आवरा राज्याला । अशानें तरले जाल चिरंजिव रहाल पहायाला ॥ कमि नव्हते०॥ ॥३॥वर्तमान कळतांच असें आलि गोष्ट ती निकरास । नये नानाचे मनास जाहले विपरित इतरांस ॥ झिडकारुनि एकांतीं वदती नित्य सरकारास । स्वस्थ असावें आपण जेऊन पंचामृत सुग्रास ॥ बहुत हट्ट जरि कराल तरि तुम्ही मुकाल प्राणांस । त्यांचि अवस्था तीच तुमची पुढे येईल आकारास ॥(चाल)॥ शब्दशरें ताडितां लोचनीं जळबिंदू वाहती । दसर्याचे दिशीं अंबारीतुन उडि घालुं पाहती । धरी अप्पा बळवंत झगा दृढ दडपुन आपुले हातीं ॥(चाल)॥ फिरविली निशाणें नाहिं सोनें लुटलें । शहरांत सैन्य चहुं रस्त्यांनीं लोटलें । पुढें भेट घ्यावया किति माणुस दाटलें ॥(चाल पहिली)॥ झालि न झाली नजर उठले एवढयांतच जायाला । नवल नविन वाटलें तेथें सकळ समुदायाला ॥ कमि नव्हते०॥ ॥४॥प्रवेशतां माहालांत अडखळुन पडले खांबाला । त्वरित उतारे करून देती लोह उडीद डोंबाला ॥ खरी खबर कळतांच एकांती बाईसाहेबांला । धांव धांव धांवण्यास म्हणती विनवुन सांबाला ॥ घरांत राहू ग्रासुं पाहतो चंद्रबिंबाला । गोत्रपुरुष किड कठिण लागली मुळकुळकोंबाला ॥(चाल)॥ करिं घेऊन पंचारति प्रभुला घनभर ओंवाळुनी । समाचार फुंद फुंदून पुसती नीर नेत्रीं ढाळुनी । पहा पहा नीट मग राव बोलती मुख आमचें न्याहाळुनी ॥(चाल)॥ तुझी आमुची भेट हीच सगुणसुंदरी । रहा खुशाल आपल्या झुलत राजमंदिरीं । द्वाहीलेखी तुझी जन वंदितील आदरीं ॥(चाल पहिली)॥ जड पडल्या करि स्मरण सदोदित संकटसमयाला । अशा परी निरवून धरती कंटाळुन ह्र्दयाला ॥ कमि नव्हते०॥ ॥५॥प्रति उत्तर परिसोन विश्वमाउली मनीं गहिंवरली । नेऊन रंगमहालीं सख्यांनीं चहुंकडून सांवरली ॥ विरक्त झाले श्रीमंत हिकडिल स्नेहममता सरली । स्नानदान देवपूजा गलबलिंत अगदींच अंतरली ॥ एकादशीची रात्र बर्यांमधि सहज मात्र सरली । उजाडतां द्वादशीस कुणीकुन कुबुद्धि संचरली ॥(चाल)॥ तिसरे मजल्यावरुनि घातली उडि कारंज्यावरी । एकाकीं, हालचाल न होतां गेलि वार्तादुरवरी । सेवकजन सर्वांग विकळ कडे खांद्यावर आंवरी ॥(चाल)॥ शके सत्राशें भर सत्राच्या अवसरीं । दक्षिणा यनामधिं राक्षस संवत्सरी ॥ आश्वीन शुद्ध पौर्णिमा भौम वासरीं ॥(चाल पहिली)॥ रवि मावळतां वरी मरण झडकरी आलें सखयाला । इथुन आतां प्रारंभ दिसंदिस अद्भुत प्रळयाला ॥ कमि नव्हते०॥ ॥६॥हाहाकार जाहल प्रगटतां पुकार शहरांत । बंद पडलिं भणभणित दुकानें भर बजारांत ॥ वृद्ध तरुण नरनारि बुडाल्या आकांतकहरांत । कुंक गंध किति सूज्ञ पुसुनी धुळ बांधिती पदरांत ॥ स्वयंभू दीप विझतांच विवशी व्यापली दरबारांत । ठायीं ठायीं थिजले लोक शोक संचारतां संधेरांत ॥(चाल)॥ बंदोबस्त कडेकोट करूनियां शनवारांतुन अधीं । अखंड स्वारि रायाची निघाली चौथीच्या अमलामधीं । दुर्लभ दर्शन ज्याचें प्रभु तो नदींत निजायचा कधीं ॥(चाल)॥ पसरुनी तुळशी कर्पुर बेल चंदन । रचियलें सरण त्या शेवटचा स्पंदन । आरुढले वीरवर नारायणनंदन ॥(चाल पहिली)॥ अनेक रिपूंचें करुनी कंदन दवडुन विलयाला । दर्भासन घातलें विष्णुलोकास बसायाला ॥ कमि नव्हते०॥ ॥७॥बाईसाहेब कल्पांत जिवाचा तळतळूनी करती । कां ग कुळस्वामिणी कोपलिस आजी मजवरती ॥ पतिपूर्वी सौभाग्यवत्या ज्या पुत्रवल्या मरती । इहलोकीं परलोकीं धन्य त्या कुळास उद्धरती ॥ कसें माझें दुर्दैव उपजलें चांडाळिण पुरती । म्हणुन श्रीमंत प्रभुची मजला अंतरली मूर्ती ॥(चाल)॥ निरोगी सात सहस्त्र उंट न पार स्वामीचे । वीस सहस्त्र तुरग निवडक भीमथडी ग्रामीचे । सबल दोनशे नव्वद कुंजर विशाल हरकामीचे ॥(चाल)॥ म्हशी दोन सहस्त्र कठिदार बाणीच्या । सहा सहस्त्र गाई फारतरी वाणीच्या ॥ काही सफेत कपिला व्याघ्रांवर खाणीच्या ॥(चाल पहिली) बैल बारा सहस्त्र एवढया जिवांस खायाला । कोण श्रीमंतांवाचून दुसरा समर्थ द्यायला ॥ कमि नव्हते०॥ ॥८॥शिकारि चित्ते व्याघ्र पटाइत वृक सांबर हरणें । जंबुक चितळे रोही भेंकरें कुरवाळुन धरणें ॥ रीस एडके गंडे सशांना बनात पांघुरणें । आपण खावें तें त्यांस पुत्रवत् किति माया करणें ॥ सुंदर रूप रायाचें नाहीं कुणावर रागें भरणें । कलगीतुरा शिरपेंच कंठिचीं पडत होतिं किरणें ॥(चाल)॥ सदयह्र्दय साक्षात् पितांबर परिधानाचा प्रभु । कृष्ण कुळीं दैदीप्य जसा काय मकरध्वज आत्पभू ॥ तसा करुन दिग्विजय शेवटी अवघड रचिला विभू ॥(चाल)॥ पाहु द्या मला तें एक वेळ श्रीमुख । जन्म तों आतां ह्या जिवास होईल दुःख ॥ भोगिलें रमाबाईनें काहीतरि सुख ॥(चाल पहिली)॥ हरी जाहला विन्मुख विसरलें पूर्विं पुजायाला । प्रयागीं जावें उठुन वाटतें ॥ समाधि घ्यायाला ॥ कमि नव्हतें०॥ ॥९॥अश्व आवडते कुंजर धेनु मृग मैना रडती । मोर खबुतरें तितर सांबरें मूर्च्छांगत पडती ॥ स्वर मंजुळ कोकीळपक्षि ते पिंजर्यामधीं तडफडती । पोपट भारद्वाज चाष परदुःखानें खुडती ॥ भूकंपा उलुका भालु रीत घन विजवा कडकडती । असंख्य तुटती तारे नभमंडळीं किरणें पडती ॥(चाल)॥ ग्रामसिंह दिवसास भयंकर सद्नद भुंकारिती । सवत्स नित अपरात्रीं गाई कितीक हंबरतीं ॥ भुतें पिशाचें खवीस डाकिणी काय हांका मारितीं ॥(चाल)॥ दोहों द्वारीं बसुनी लक्ष्मी पिंपळावरी । करी दीर्घ रुदन मध्यान्ह होतां शनिवारीं ॥ नाहीं राहात आतां होईल आकाशवाणी वरी ॥(चाल पहिली)॥ शक्ति घेऊन श्रीहरी निघुन जातां मूळ ठायाला । सव्यसाचि सारखे लागले मागें पाहायाला ॥ कमि नव्हते० ॥ कमि नव्हते०॥ ॥१०॥प्रमुख नानासहित शहाणपण सगळ्यांचे खूटलें । तबीबांनी वैद्यांनी रसायण स्वहिताचें कुटलें ॥ परंतु मंगळसूत्र गळ्यांतिल मुळिं माझें तुटलें । राजहौस पांखरु हातांतिल दैवदशें सुटलें ॥ जन्मांतरी सुतर्शन घेऊन असेल काही लुटलें । सौभाग्याचें तारूं म्हणुन वैधव्यजळीं फुटलें ॥(चाल)॥ मनीं एक एक आठवुन सुशोभित कुरळ केंस तोडिती । आतां दृष्टि कधीं पडाल टाहो करुण स्वरें फोडिती ॥ वदनेंदुवर बिंदु पटपटां डोळ्यांतुन सोडिती ॥(चाल)॥ सातशें दासी गुणी नाटकशाळा किती । पाहतांच प्रभु कांही ओवाळुन टाकिती ॥ त्या आतां अजीत अजास दैन्य भाकिती ॥(चाल)॥ चौदाशें घरगुलाम मुकले ह्या निजपायांला । चाकर तर लक्षानुलक्ष लागतिल फिरायाला ॥ कमि नव्ह्ते०॥ ॥११॥मरण यावें काय ब्राह्मणशापानें । दंश करावा काय किडीच्या तक्षक सापानें ॥ तसेंच जहालें काय प्रभूंना कोणाचे कोपानें । संकट पडलें काय दिलासेल जिव संतापानें ॥ जांवई पहाले काय श्रीमंत माझ्या बापानें । वाटे आतां वैराग्य होइल काय ह्या अनुतापानें ॥(चाल)॥ एकवीस वर्षें पूर्णमासावर सवा पांच, अग ॥ दिसं दिवस भाग्याचा उदय हे दयाळु महाराज ग । अंतरले ते मला आतां आण जहर तरी पान ग ॥(चाल)॥ ईश्वरा कशी मजवर आग पाखडलिस ॥ आयुष्यदोरि तूं मधेंच कातरलिस ॥ का पेशव्यांची ही वंशवेल खुडलिस ॥(चाल)॥ अपार दिधलिस संपदा सुख भोगायला । शतायु केलेंस नाहीं तसें हरी प्राणविसाव्याला ॥ कमि नव्हते०॥ ॥१२॥हरि घरचा नाहीं नेम टळाचा परंतु हा टळला । पहा पहिल्या प्रहरांत सूर्य नारायण मावळला । गरिब गाइवर विशाळ पर्वत समूळ कोसळला । वंशवनावर चहुंकडून क्षयदावाग्री वळला ॥ बाळाजी विश्वनाथ तारक सर्वांना मिळाला । रत्नदीप झळझळीत केवळ कुळांत पाजळला ॥(चाल)॥ काशी बाइ ती धन्य सती रावबाजी पुत्र प्रसवली । छत्तीस महिने लढुन वसई पुढें आपानीं वसविली । दक्षण साडे सहा सुभ्यांत सरदेशमुखी बसविली ॥(चाल)॥ नानांची कंची वासना नाहिं राहिली । पुरुषार्थ करुन दादांनीं अटक पाहिली ॥ भाऊंनीं कुरुक्षेत्रास कुडी वाहिली ॥(चाल पहिली)॥ रणीं जागा विश्वासराय ती पाहिली निजायाला । जनोबांस मारून मूठ काय मिळालें बायाला । कमि नव्हते०॥ ॥१३॥दर रिकिबीस तलवार जरब सर्वोवर दाबाची । हुकूम मोडिल कोण कठिण मेहनत रावसाहेबांची ॥ निवडक चाळिस सहस्त्र बरोबर फौज कराराची । शौर्यतेज पाहून छाती तडके नबाबाची ॥ कावेरी उत्तर तीर हद ठरवून शिवाराची । भोंसल्याची रग जिरवुन धरली आस हेरंबाची ॥(चाल)॥ थेवरास ते समाप्त होतां वैरी फिरून पोसती ॥ वीर पदरचे दिलगिर सारे रायांविन असती । करून निर्वानिरव रमाबाईसाहेब गेलि सती ॥(चाल)॥ नंतर नारायणराव तें पद पावले । दहा महिने मात्र सौख्याचे दिवस दावले ॥ गारद्यांस दुपारी अडचशीत पावले ॥(चाल)॥ घाबरून चुलत्यांचीच गेले पाठ रिघायाला । ढकलुन देतांक्षणी साधली संध शिपायाला ॥ कमि नव्हते०॥ ॥१४॥झाला जन्म त्या कुळांत माझ्या बाई राजेंद्राचा । केवळ माधव मूर्ति म्हसोबा नव्हेच शेंदराचा ॥ अणीक मंत्री मर्द मराठ बंद्रोबंद्रांचा । ऐरावत बांधूत आणतिल प्रसंगी इंद्राचा ॥ येथे न चाले यत्न ब्रहस्पती भार्गव चंद्राचा । उपाय असता तरी न मरता बाप् रामचंद्राचा ॥(चाल)॥ हरहर जगत्रिवासा, अतां काय करूं । पोटी जरी एक झाले असते राजबीज लेकरूं ॥ राज्य न बुडते मी मात्र मरत्ये शोक सदा करकरूं ॥(चाल)॥ पुढे काळ सख्यांनो कसा मी घालवूं । हिरकणी कुटुन जाऊं पाण्यामध्ये कालवूं ॥ ती पिउन पौढत्यें नका ग मज हालवूं ॥(चाल)॥ जा समया मालवून आपल्या घरास न्हायाला । जिवंत मी असल्यास उद्यां या नेत्र पुसायाला ॥ कमि नव्हते०॥ ॥१५॥धन्य वंश एकेक (जणु) कल्पवृक्ष पिकले । शत वर्षे द्विज पक्षी आनंदे त्या तरुवर टिकले ॥ जलचर हैदर नबाब सन्मुख रण करितां थकले । ज्यांनी पुण्याकडे विलोकिले ते संपतिला मुकले ॥ असे प्रभु कसे अमर कराया ब्रह्मदेव चुकले । गहन गती कर्माची सर्वजण पूर्वी फळ विकले ॥(चाल)॥ संपविला अवतार धन्यांनी म्हणे गंगुहैबती । ध्वज पडले उलथुनी थडकल्या सुरु साहेब नौबत ॥ कोण करिल प्रतिपाळ तुर्त मुलुखास लागली बती ॥(चाल)॥ महादेव गुणीराज श्रुती गादिचे । नवे नुतन नव्हती शाईर जदिप वादिचे ॥ पीळ पेच अर्थ अक्षरांत वस्तादिचे ॥(चाल पहिली)॥ प्रभाकराचे कवन प्रतिष्ठित सभेंत गायाला । अशा कवीची बुज नाही कोणि करायला ॥ कमि नव्हते०॥ ॥१६॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP