मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
एका खडी बोला कशि गत झाली ...

पहिल्या बाजीरावाचा मृत्यु - एका खडी बोला कशि गत झाली ...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


एका खडी बोला कशि गत झाली बाजीला ॥ध्रु०॥
कक काशिबाई गहिंवरे । खख खबर गेली पुणियारे ॥ गग गाय जशि हंबरे । घरोघरी झाला कहार ॥ देव कोपला ॥कशि०॥ ॥१॥

नाना पुसतसे आपाला । चिमाजी गहिंवरे दाटला ॥ छछ छत्र होतें आम्हांला । जज जनम थोडा जाहला ॥ पहाड पडला ॥कशि०॥ ॥२॥

झझ झडकुनी आलें मरण । या देवाने केला खुन ॥ टट टोडूनी नेलें रतन । ठठ ठार झाला प्राण । नरमदेला ॥कशि०॥ ॥३॥

डवलतेचा खांब होता ॥ ढढरणीवर पडला आतां ॥ णाणा म्हणे ’कुठेपाहु पिता । ततारा झमकत होता ॥ अंधकळा’ ॥कशि०॥ ॥४॥

थथरकत बाजी बहिरी । ददलांत मोंगलावरी ॥ धधरुनि मोरचे मारी । नाना म्हणे श्रीहरी ॥ वैराकार केला ॥कशि०॥ ॥५॥

पपप्यार शाहूराजाचा । फफरारा जरताचा ॥ बबाळाजी बाप त्याचा । भारांत उमराव दक्षिणेचा ॥ मोहरा गेला ॥कशि०॥ ॥६॥

माय म्हणे बाजीरायासी । रंगमाहाली कधीं बैससी ॥ लोलाविला सर्वासी । अंतरला ॥कशि०॥ ॥७॥

ववजावुनी बैसला वनीं । सससाया धरली कुणी । खलवीत जन गेले टाकुनी । शाशा शाहीर वर्णील गुणी । उमरावाला ॥कशि०॥ ॥८॥

हा पवाडा बाजीरायाचा । अलंक्षा एका गाखडी गायाचा । झाडा जाहला अक्षरांचा । साळी त्रिंबक श्रीगोंद्याचा । अभंगाला ॥कशि०॥ ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP