मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर| भाऊसारखा मोहरा । आम्हांवर... अज्ञात शाहिर चाल - “ लक्षुमि गर्वे निं... बुधीहाळ किला बाका ॥ दुरुन... त्रिंबकराव दाभाडे एका खडी बोला कशि गत झाली ... शाहूमहाराज शिव झाला । अवत... तुझे गुणमी वर्णू किती छत्... भाऊ नाना तलवार धरून । गेल... भाऊसारखा मोहरा । आम्हांवर... भाऊ नानाच दुःख ऐकतां ह्रद... धन्य भगवाना नेलास मोतीदाण... सांग रमाबाई सत्त्वधीर । र... दक्खनचा दिवा मालवला हिरा ... दुक्षिणचा दिवा मालऽऽऽवला ... सवाई माधवराव पेशवे सवाई च... शिपाई थाट रोहिले जाट गांठ... पटवर्धनकुळीं फत्ते तलवार ... जसा रंग श्रीरंग खेळले वृं... द्वापारीं श्रीमाधवविलास भ... १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० कमि नव्हते पृथ्वींत अवंतर... श्रीमंत बाजीराव प्रभुचें ... वाहवाजी मल्हार नाव केलें ... घनी छत्रपती शिवराज नेमले ... सकी आद करवीर तकत थोरजागा... करविर किल्ला बहु रंगेला प... सुभेदार यशवंत कन्हेया सदा... उगा भ्रमसि बा उगा कशाला य... दक्षणच्या पेशव्यांशीं घाल... जास्त आढळले सबब त्या दोघा... पंढरीराया करा दया हालीव स... यशस्वी झाले श्रीमंत पहिले... पुणे शहर किलवाणी दिसती जा... दिन असतां आंधार आकाशतळीं ... गगन कडकडून पडलें, पार नाह... श्रीमंत ईश्वरी अंश धन्य त... जगदीश्वर कोपला गोष्ट झाली... श्रीमंत पेशवे प्रधान बहु ... भले भले सरदार जमून सारे प... श्रीमंतमहाराज सवाई रावसाह... तासगाव अपूर्व परशुरामभाऊच... धोशा धुळपाचा अति आनंदराव ... नमीन मंगलमूर्ती ॥ म्यां न... १ माझे मन नमन मंगलमूर्ति ... आजि इंग्रजाचा गर्व । केला... सेखोजी सहोदरातें आला । या... सर केला टिपू सुलतान फिरंग... शिपाई चाकरी गेले नागपुराल... भले नाना फडणीस केली कीर्त... सोमवाराचे दिवशीं निघाले प... मानवी तनू अवतार धरूनी केल... सोडून सारा राज्यपसारा निघ... श्रीमंत म्हाराज पेशवे धनी... श्रीमंत बाजीराव कन्हया श्... श्रिमंत झाले लोक श्रिमंता... केले दंग समशेरजंग इंगरेजा... करूनि गेली राज ह्याराज सक... सति धन्यधन्य कलियुगीं अहि... पुण्यप्रतापी धन्य जगामधि ... सवाई जानराव धुळप मोहरा वि... धनी सयाजी महाराज धुरंधर भ... दामाजीपंतांनी जगविले ब्रा... नांदगांव प्रगाणा जागा आजं... श्रीमंत पंतप्रधान उभैता भ... तिसर्या रघूजी भोसल्याचा पोवाडा पानपतचा दुसरा पोवाडा - भाऊसारखा मोहरा । आम्हांवर... पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो. Tags : povadaपोवाडामराठी शाहीर - रामा सटवा ( चाल - ‘वारी संकट हरि दमाजींचे । कौतुक देवाचे ॥’ ) Translation - भाषांतर भाऊसारखा मोहरा । आम्हांवर का रूसला पंचीप्यारा ॥ध्रु०॥बहुत दिवस झालो शाहूला । जावे निजभवनाला ॥ नाना राखावे तुम्ही राज्याला शिक्क दिधला त्याला ॥ अष्ट प्रधान भाऊ बाजूला । हवालले राज्याला ॥ मुलूख मारून केला चकचुरा । दुसमान कापे थराथरा ॥ भाऊसारखा० ॥१॥बारा वर्षे झाली राज्याशी । कळून आले त्याशी ॥ धाड पडो रे त्या मुलखाशी । कुणिकुन आली इवशी ॥ भाऊने हकारले राव सकळाशी ॥ कुळ दक्षिणभाईशीं ॥ दिली नौबद गेला दिल्लीशीं । हालीवलें तक्ताशीं ॥ रणखांब रोवुनि मारितो तलवार । काशी तीर्थ अवधारा ॥ भाऊअ सारखा० ॥२॥तखत फोडुनि केली धुळधाणी । असा नाहि झाला कोणी ॥ या त्रिभौंण रायाची करणी । नाव गेले राहुनि ॥ विश्वासराव बसविले नेऊनी ॥ लिहिले होते कर्मी ॥ धडले टांकसाळि रुपये आणि मोहोरा । दिला अवध्यांशी रोजमुरा ॥ भाऊसारखा० ॥३॥पहिली लढाई झालि कुंजपर्यावर । सकळ घेउनि दळभार ॥ म्होरें रोखले कमाणतीर ॥ मार होती चौफेर ॥ कुतुबाशहा मारूनि केला चकचूर । त्याचे कापिले शिर ॥ लुटला कुचपुरा दौलत फार । झाले आभय लष्कर । आला दक्षिणचा राजा धुरंधर ।(आणि) भाऊसारखा वीर ॥ सुटला अबदालीशी दरारा । म्हणे आतां सल्ला करा ॥ भाऊसारखा० ॥४॥सल्ला ऐकेना झाला विघोड । अवघा मुलुख सोड ॥ रुपये देत होता दोन क्रोड । धरिली भाऊनी आड ॥ “तुजला मारिन मी, करिन वेड ॥ कंधार पाहिन पुढं ॥ रोवला रणखांब होती धडाधड । नदि जमुनेच्या कड ॥ खेत्री हाणा म्हणती रणशूरा । कुळक्षेत्री धरिल थारा ॥ भाऊसारखा० ॥५॥पहिली लढाई झाली फार ठिक । केले मोचे तकीप ॥ भोता खांदलासे खंदक । मधे भाऊचे लोक ॥ कुणिकुन आला लबंडिचा घातक । होती बातनी ठिक ॥ दोन वेळा फिरविला माघारा । गिलचा केला घाबरा भाऊसारखा ० ॥६॥प्रथम पडला गोविंदपंत बुंदेला । केला भाऊनी हल्ला ॥ विसा हजारांशी गिलचा आला । हुजरातीवर पडला ॥ मग साहिना बळवंतरायाला । ढिगांत जाउनि पडला ॥ भाऊ विनवितो बहादरा । रणी राहिला बिचारा ॥ भाऊसारखा० ॥७॥एक दिवस नेमला मरणाचा । वखत निर्वाणीचा । भाऊनी पैगम केला सगळांचा । धंवशा वाजे त्याचा ॥ शाइसी हजार खासा नावाचा । धुंरधुर भाऊचा ॥ एकाएकी आला सामोरा । दिला कुचाचा नगारा ॥ भाऊसारखा० ॥८॥मोरचे वाटु न दिले लवकरी । तमाम फौजा सारी ॥ बुनगे घातलेसे माघारी । हाकारिली मग स्वारी ॥ जसा चंद्र निघाला बाहेरी प्रभा पृथिमीवरी ॥ यकायकी झाकळली बरी । धनकर त्याची थोरी । जनगुजी मार देतसे झराझरा ॥ जसा आगनीचा आगारा ॥९॥गिलच्ता मार देतसे चवुफेर । मधी वुभे लष्कर ॥ विभ्रामखान खासा बिनिवर । यशवंत पवार ॥ दिवस उरला घटका दोच्यार ॥ मग धरवेना धीर ॥ एकला तिथ टिकल कुठवर । सोन्या तुटली पाहारा ॥ इभ्रामखान खासा खराखुरा । रणी आला पायउतारा ॥१०॥विश्वासराव शिपाई रणशूर । भले राजकुवर ॥ मारितो फौजा हाती तलवार । रणात होऊनि स्थीर ॥ भोवती गोळ्या वर्षती अपार । मधे उभे सरदार ॥ गिलचा कापला बेसुमार । भाऊ म्हणे मागे फिर ॥ अवचित गोळि लागली धुरंहरा । मुखी बोलला हराहरा ॥ भाऊसारखा ० ॥११॥समशेर बहादर रणशूर रणगाडा । रणी वाजे चौघडा ॥ हटकुन गिलचे हाणितो धडाधडा । ढाल तलवार जमदाडा ज्याणे रणी अडविला तीस घोडा । सन्मुख दावी मुखडा ॥ राव बाजीला पुत्र जसा हिरा । येती जखमाच्या लहरा ॥ भाऊसारखा० ॥१२॥जनकोजी शिंदे रणशूर रणगाजी । चढती तुरंग तेजी ॥ त्याला भाऊसाहेब होते राजी । बाजू राखा माजी ॥ मग फुरारले राव जनकोजी । शिरीं छत्र सोभे जी । नित्य नेम गिलचा कापतो चरांचरां शिर धाडितो पहा नजार । भाऊसारखा० ॥१३॥चेतली जणुं खुप झालि लढाई । मार होती सवाई ॥ त्याचा रंग बारगीर बिलाई । गिलचा करितो घाई ॥ झाला मोड पडती कुळशाही । पालखिस गणती नाहीं ॥ एक एक पळुन आला माधारा । रणीं राहिला बिचारा ॥ भाऊसारखा० ॥१४॥सोनजी भापकर मानाजी पायगोडे । रणीं टाकिले घोडे ॥ तुकोजी शिंदे पडले पायांपुढे । जैसे अग्रीचे हुडे ॥ आणखी दमाजी गायकवाड । होळकर रणभिडे ॥ अवघ्या शाहीवर आली घाड । अवचित झाला मोड ॥ एकएक पळुन आले माघारा । का परतुन घातले सैन सारा ॥ भाऊसारखा० ॥१५॥कशि गत झाली गडयांनो भाऊला । जनकोजी शिंद्याला ॥ लोक पुसती एकुनेराला । आम्ही नाहिं पाहिला ॥ भाऊसारखा मोहरा हरपला । काय सांगावें नानाला ॥ भाऊला नाहीं कोणाचा आसरा । वेढा घातला चौफेरा ॥ भाऊसारखा० ॥१६॥ज्याला पडली भाऊची भ्रांत । ते राहिले रणांत ॥ फितुरी पळुनि आले दखणांत । वांचविली दौलत ॥ त्यांचा ईश्वर करिल सत्यनाश । यश दिले गिलचांस ॥ भाऊची भ्रांत पडलि नारिनरां । सकळ जनां लहानथोरां ॥ भाऊसारखा० ॥१७॥कागद आला राव नानाला । होते उजन्या नगराला ॥ कागद वाचितां आंग टाकि धरणीला । मोठा अतिशो केला ॥ आम्हांवर श्रीहरि देव कोपला । विक्षोप आणिला राज्याला ॥ दाटला गंहिवर गोपिकाबाईला । अति कहर वर्षला ॥ नाना फिरुनि चालले माघरां । दिला कुचाचा नगारा ॥ भाऊसारखा० ॥१८॥भाऊसाठीं झुरतीं जनावर । जंगलची पांखर ॥ राघू मैना आणि खबुतर । टाहो करिती फार ॥ कुणीकडे गेला आमचा मनोहर । सपन झाल खर ॥ पैसा मिळेना म्हणती सार । बंद झाले सावकार ॥ फुटला पर्वतीशी घाम दरदरां । वाडा गजबजला सारा ॥ भाऊसारखा० ॥१९॥आम्ही पद बांधिले “ वैताग । जिवास केला त्याग? ॥ कोणीकडे गेले भाऊ श्रीरंग । नानाचे जिवलग ॥ कधीं भेत देईल आम्हां संग । जिवा होईल खुषिरंग ” ॥ एथुन झाला पदाचा अभंग । म्हणे महादु कविरंग ॥ रामा सटवा म्हणे दातारा । वाट पाहतो खरोखरा ॥ भाऊसारखा० ॥२०॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP